शिक्षण

साने गुरूजींचे विचार आत्मसात करावेत; उपमुख्याध्यापिका योजना निकम

पुणे (हडपसर) : थोर देशभक्त, समाजसुधारक, विचारवंत, लेखक साने गुरुजी संपूर्ण आयुष्य समाजासाठी जगले. स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगणाऱ्या अशा थोर महापुरूषांचे विचार आपण आचरणात आणावेत असे प्रतिपादन साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्युनिअर कॉलेजच्या उपमुख्याध्यापिका योजना निकम यांनी केले.

          साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे साने गुरूजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

         सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले.विद्यालयातील शिक्षिका चित्रा हेंद्रे यांनी साने गुरूजींवर आधारित गीत सादर केले.या निमित्ताने सिद्धार्थ देशमुख, शौर्य येलूतवाड या
विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंगेश म्हेत्रे यांनी शिक्षक मनोगतात साने गुरूजी यांच्या समग्र जीवनकार्याचा आढावा घेतला.

          कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,माधुरी राऊत,आजीव सेवक अनिल मेमाणे सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामिनी केदारे यानी केले. सूत्रसंचालन अनिल वाव्हळ यांनी केले. तर आभार स्मिता पाटील यांनी मानले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??