जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकासाचा आढावा ; गुणवत्तेसह कामे जलद पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले…

पुणे : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर येथील बलिदानस्थळ व वढू बु. येथील समाधीस्थळाच्या विकासकामांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आढावा घेतला. स्मारक विकासाची कामे गुणवत्तापूर्ण, टिकाऊ व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या पाहणी दरम्यान आमदार ज्ञानेश्वर कटके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, उपअभियंता अजय पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या पवित्र भूमीत आल्यावर ऊर्जा लाभते. महाराजांनी धर्मासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून या स्थळाला पर्यटनस्थळ नव्हे तर तीर्थस्थळ म्हणून पाहिले जावे. या ठिकाणाला तीर्थस्थळाचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षा आहे.”

स्मारकाच्या विकासासाठी केईएम हॉस्पिटलची जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवला असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत पुढील आठवड्यात चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. संपूर्ण समाधीस्थळाचे सुशोभीकरण प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लोकसेवा प्रतिष्ठानच्या पुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांच्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे व रांगोळीच्या माध्यमातून साकारलेल्या त्यांच्या चित्राचे कौतुक केले. तसेच ‘ईश्वरपुरम्’ या पूर्वांचलातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाला भेट देऊन बांधकामाची माहिती घेतली आणि चीन–म्यानमार सरहद्दीवरील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??