शिक्षणसामाजिक

जेएसपीएम फार्मसी महाविद्यालयात बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती ‘पराक्रम दिना’निमित्त उत्साहात साजरी…

पुणे : जेएसपीएम जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पुणे येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतीकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे हा दिवस ‘पराक्रम दिवस’ म्हणून देशप्रेमी व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोसबाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी ‘जय हिंद’, ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीने भारावून टाकला.

प्राचार्यांनी आपल्या भाषणात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शिस्तप्रिय जीवन, त्याग, धैर्य व नेतृत्वगुण आजच्या तरुण पिढीसाठी कसे मार्गदर्शक आहेत, यावर सविस्तर प्रकाश टाकला. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, त्यांचे सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक योगदान आजही तरुणांना दिशा देणारे असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी बाळासाहेबांचे आदर्श जीवनात अंगीकारावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अनुराधा पाटील व प्रा. निकिता कोलते यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. रविराज जाधव, प्रा. चेतन मामडगे, प्रा. तनुजा काशीद, स्वप्नाली सावंत, प्रियांका महाजन, विवेक थोरात, स्वाती माकोने, रुपाली शिंदे, प्रतीक्षा थोरात, ऋतुजा दाते, पांडुरंग पवार, कल्पना सुरवसेआकांक्षा जाधव यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शिस्त, नेतृत्व व समाजभानाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??