क्राईम न्युजदेश विदेशमहाराष्ट्र

गुजरातमध्ये अमानुष कृत्य; पतीचा स्पर्म काउंट कमी असल्याने सासरा, नणंदेचा पती यांच्याकडून वारंवार बलात्कार, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल

गुजरात (वडोदरा) : पतीचा स्पर्म काउंट कमी असल्याने ती गर्भवती रहावी, या कारणावरून सासरा, नणंदेचा पती आणि नात्यातील इतरांनी वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ४० वर्षीय पीडित महिलेने पतीसह सासरकडील नातेवाईकांविरुद्ध नवपुरा पोलीस ठाण्यात बलात्कार, मारहाण, ब्लॅकमेल आणि धमकावण्याचे गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, पीडितेचे फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्न झाले. काही आठवड्यांतच सासरच्या मंडळींनी तिच्या वयामुळे ती गर्भवती राहणार नाही अशी शक्यता व्यक्त केली आणि वैद्यकीय तपासणीचा सल्ला दिला. तपासणीत पतीचा स्पर्म काउंट अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महिलेने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयव्हीएफ उपचार घेतला, मात्र तो निष्फळ ठरला. पुढील उपचार नाकारून तिने बाळ दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली, पण सासरकडून याला विरोध करण्यात आला.

जुलै २०२४ मध्ये महिला तिच्या खोलीत झोपलेली असताना सासरा आत घुसला आणि बळजबरीने शरीरसंबंध ठेवले. मदतीसाठी आरडाओरडा करताच तिला मारहाण करण्यात आली. हा प्रकार पतीला सांगितल्यावर त्याने “मला बाळ हवे आहे, तोंड बंद ठेव” असे सांगत नग्न फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर सासऱ्याने अनेक वेळा अत्याचार केला, मात्र ती गर्भवती राहिली नाही.

डिसेंबर २०२४ मध्ये नणंदेच्या पतीनेही तिच्यावर बलात्कार केला. जून २०२५ मध्ये ती गर्भवती राहिली, परंतु जुलै महिन्यात गर्भपात झाला. या काळात सासरकडील मंडळींनी सतत त्रास, धमक्या आणि ब्लॅकमेल सुरू ठेवले. शेवटी मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून पीडितेने पोलिसात धाव घेतली.

सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून सासरा, पती, नणंदेचा पती आणि इतर संशयितांविरुद्ध तपास सुरू केला आहे. या घटनेने वडोदरा तसेच संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??