जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

महिला तलाठ्याचा महिला आयोगाकडे थेट आरोप, मंडल अधिकाऱ्याच्या छळाला कंटाळून तक्रार ; महिनाभरातच भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, संशयाचे सावट मंडल अधिकाऱ्यावर!

पुणे, ता. 8 : हवेली तालुक्यातील महसूल विभागात अधिकाराचा दुरुपयोग, मानसिक छळ आणि महिलांचा अपमान अशा गंभीर आरोपांनी वाद पेटला आहे. कुडजे (ता. हवेली) येथील महिला ग्राम महसूल अधिकारी शारदा पाटील यांनी मंडल अधिकारी भारत रुपनवर यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे थेट तक्रार दाखल केली आहे.

पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे की, रुपनवर हे गेल्या एक वर्षापासून हेतुपुरस्सर मानसिक त्रास, अपमानास्पद वर्तन आणि अशोभनीय वागणूक देत आहेत. कामाच्या नावाखाली पाटील यांना कार्यालयात तासन्‌तास बसवून ठेवणे, रात्री उशिरापर्यंत थांबवणे, तसेच असभ्य दृष्टिकोन आणि वर्तनाने अपमानित करणे, असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.

विशेष म्हणजे, या तक्रारीनंतर अवघ्या महिन्याभरातच शारदा पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या कारवाईमागे ‘बदला घेण्याचा डाव’ असल्याची जोरदार चर्चा महसूल विभागात रंगली आहे.

पाटील यांनी सांगितले की, व्हॉट्सअॅपवर नोटीस पाठवून मंडल अधिकाऱ्यांनी एका तासात सर्व दप्तर घेऊन कार्यालयात बोलावले. रात्री आठपर्यंत थांबवून “शेजारी बसा” असा दबाव टाकण्यात आला. “त्यांची महिलांविषयीची विचारसरणी अत्यंत गलिच्छ आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

याशिवाय, गौणखनिज कारवाईदरम्यान वाहन अडविल्याप्रकरणी जबाबदारी ढकलत रुपनवर यांनी पाटील यांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. विरोध केल्यावर सर्वांसमोर अपमान केला. पाटील यांनी सांगितले की, रुपनवर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे सांगून बेकायदेशीर नोंदी परत घेण्यासाठी दबाव आणला. नायब तहसिलदारांचे नाव वापरूनही फेरफार करण्याचे आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या सर्व घटनांमुळे शारदा पाटील यांनी महिला आयोगाकडे आपली तक्रार दाखल करत न्यायाची मागणी केली आहे. महसूल विभागात या प्रकरणाने एकच खळबळ उडाली असून, महिला कर्मचाऱ्यांमध्ये “सत्तेच्या खुर्चीचा वापर करून छळ चालतोय का?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, महिला आयोगाने या प्रकरणाची नोंद घेतली असून, मंडल अधिकारी भारत रुपनवर यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. विभागीय तपास सुरू होण्याची शक्यता असून, महसूल खात्यातील या वादाने प्रशासनाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??