क्राईम न्युज

मारहाण केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, अहवाल आल्यानंतर आरोपीला ताब्यात घेवून चौकशी केली जाईल ; संजय मोगले पोलिस निरीक्षक.

पोलिसांनी न्याय केला नाही. असे माझे मत आहे. तरी आरोपीला लवकरात लवकर अटक करावी. फिर्यादी महिला माधुरी पवार.

पुणे (हडपसर) : रस्त्यामध्ये चारचाकी गाडी का लावली यावरुन वाद झाला. यावादातून तरुणाने एका ३३ वर्षीय महिलेसह तिच्या पतीला जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ५.२५ वाजता घडली.

याबाबत हडपसर भागातील मांजरी गावात राहणाऱ्या माधुरी निखील पवार ( वय ३३, रा. श्रीनाथ निवास, नंदिनी टकले नगर, मांजरी बु. ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, तुषार झेंडे (रा. मारी गोल्ड प्लाझा सोसायटी, नंदिनी टकले नगर, मांजरी बु.) या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला मारहाण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचारासाठी एका खागसी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी गावात महिला सासु सासरे आणि पतीसह वास्तव्यास आहे. फिर्यादी महलेलचे पती मगरपट्टा येथी एका आयटी कंपनीत नोकरीस आहेत. आरोपी झेंडे हा त्यांच्या बंगल्याशेजारील सोसायटीमध्ये राहतो. फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख आहे. फिर्यादी माधुरी या शुक्रवारी (दि.१४) त्यांच्या माहेरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यासाठी त्यांनी कॅब बुक केली होती. त्यानुसार कॅब त्यांना घेण्यासाठी बंगल्यासमोर आली. रस्त्यामध्ये थांबल्यानंतर महिला आणि तिचे पती असे दोघे मिळुन कॅबमध्ये त्यांचे सामान ठेवीत असताना, बंगल्याजवळील सोसायटीमध्ये राहणारा आरोपी तुषार झेंडे हा दुचाकीवरुन आला. त्याने कॅब चालकास तुला गाडी निट लावता येत नाही का रस्त्यामध्ये गाडी का लावली, अशी विचारणा केली. त्यावर फिर्यादी माधुरी यांनी दादा आम्ही दोन मिनिटात जात आहोत असे म्हणाल्यावर तो तेथुन निघाला. पुढे जात गाडीच्या आरशात पाहत बडबड करत होता. त्याचवेळी माधुरी यांच्या पतीने कॅब चालकाला काय बोलणे याची माहिती घेत होते. याचा अंदाज घेत आरोपी झेंडे पुन्हा वळून कॅब जवळ आला. कॅब चालकाला काय विचारतो. असे म्हणून माधूरी यांचे पती आणी झेंडे यांच्यात वाद सुरु झाले. त्यानंतर शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. माधुरी यांच्या पतीने प्रतिकार करताच झेंडेने त्यांच्या डोक्यावरील हेल्मेट काढुन माधुरी यांच्या पतीच्या डोक्यावर मारले. त्यात मध्ये आलेल्या माधुरी यांना देखिल माहारण करण्यात आली. हेल्मेटने त्यांच्या मानेवर उजव्या बाजुस मारहाण केली. हा गोंधळ ऐकून माधुरी यांचे सासु व सासरे खाली आले. त्यांनी मध्ये पडुन सोडविण्याचा प्रयत्न केला असता, तुषार झेंडे हेल्मेटने व लाथाबुक्याने मारहाण करत होते. त्यावेळी माधुरी यांनी झेंडेला ढकलुन दिले असता, त्यांने जमीनीवरील दगड उचलुन त्यांना फेकून मारला. तो दगड त्यांच्या डाव्या डोळ्याला लागल्याने रक्त येवू लागले. झेंडे याने मारहाण केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी झेंडेला पोलिसांनी ताब्यात घेतले नाही.

                              माधुरी पवार, फिर्यादी महिला.

आरोपीने मारहाण केल्यानंतर त्याच्या विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपीने मला मारहाण केली. पोलिसांनी आरोपीवर कोणतेही विनयभंग केल्याबाबत कलम लावले नाही. रात्री १२ पर्यंत पोलिस ठाण्यात थांबण्याची वेळ आली. कोणतीही चुक नसताना त्रास सहन करावा लागला. आरोपीला ताब्यात घेवून चौकशी करण्यापेक्षा पोलिसांनी त्याला रात्री १० वाजताच घरी सोडले. पोलिसांनी न्याय केला नाही. असे माझे मत आहे. तरी आरोपीला लवकरात लवकर अटक करावी.

                   संजय मोगले, पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे.

चार चाकी रस्त्यात आडवी लावल्याच्या वादातून एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेला उपचार घेण्यासाठी सांगितले आहे. आरोग्य तपासणी केल्यानंतर तपासणी अहवाल आल्यानंतर आरोपीला ताब्यात घेवून चौकशी केली जाईल. संबंधित गुन्ह्याचा तपास केला जात आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या हकीकतीनुसार जबाव घेण्यात आलेला आहे. पोलिस ठाण्यात महिला अंमलदार हजर होत्या.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री अमोल रजपूत 8169324814 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??