महाराष्ट्रसामाजिक

Social Media वर Viral Video मुळे मुंबईत तणाव…

कुर्ल्यात महामार्गावर वाहनांवर ‘I Love Muhammad’चे Sticker; मुंबईत दंगल घडवण्याचे कारस्थान...

मुंबई : ३० सप्टेंबर महाराष्ट्रात अलीकडे धार्मिक तणाव वाढलेले असताना आता कुर्ल्यातील एका प्रकारामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. सोमवारी अहिल्यानगर येथे Rangoli वरून वाद निर्माण झाला, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड येथे WhatsApp Status मुळे तणाव वाढला. त्यानंतर आता कुर्ल्यात Highway वर वाहनांवर ‘I Love Muhammad’ Sticker चिटकवल्याने वातावरण तापले आहे.

कुर्ला परिसरात काही युवकांनी ‘I Love Muhammad’ असे लिहिलेली Sticker तयार करून महामार्गावरून जाणाऱ्या Car, Rickshaw, Scooter यांसारख्या वाहनांवर जबरदस्तीने चिकटवली. या प्रकाराचा Video Social Media वर Viral झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या घटनास्थळी जाण्यास निघाले. मात्र Police यांनी त्यांना थांबवून Station मध्ये नेले.

सोमय्यांचे वक्तव्य…

पत्रकारांशी बोलताना सोमय्या म्हणाले, “कुर्ल्यातील Video मध्ये स्पष्ट दिसते की Police च्या उपस्थितीत Sticker चिकटवली जात होती. मग Police यांनी त्यावेळी Action का घेतली नाही? आपला धर्म मानायचा, श्रद्धा ठेवायची ती ठेवा; पण रस्त्यावर गाड्या अडवून Sticker लावणे ही Dadagiri आहे. हिंमत असेल तर Highway वरील Hotel, Shop वर Poster लावून दाखवा.”

त्यांनी पुढे आरोप केला की, “हे प्रकार केवळ धार्मिक भावना भडकवण्यासाठी केले जात आहेत. Rickshaw, Scooter, Car वर जबरदस्ती Sticker लावणे हे लोकशाहीला आणि कायद्याला धरून नाही. मला घटनास्थळी जाऊ दिले नाही, Police मला अडवून थेट Police Station मध्ये घेऊन जात आहेत.

अहिल्यानगरमधील घटना…

सोमवारी अहिल्यानगरमधील माळीवाडा येथे Durga Mata Doud च्या स्वागतासाठी काढलेल्या Rangoli वर मुस्लिम समाजाने आक्षेप घेतला होता. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. मात्र, Police Station समोर जमलेल्या जमावाने मारहाण केली. Police यांनी सौम्य Lathimar करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दुपारी कोठला परिसरात Muslim समाजाच्या Rasta Roko आंदोलनादरम्यान दगडफेक, Toadfod झाली. यात Police वरही दगडफेक झाली. Police यांनी तीव्र Lathimar करून जमावाला पांगवले. या प्रकरणी Topekhana Police Station मध्ये ३९ जणांसह सुमारे १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ३२ जणांना अटक करण्यात आली आहे.

परिस्थिती तणावग्रस्त, पण नियंत्रणात…

कुर्ल्यातील या Sticker प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Social Media वर Viral होणारे Video, धार्मिक घोषणाबाजी आणि राजकीय नेत्यांची वक्तव्ये यामुळे मुंबईतील वातावरण ढवळून निघाले आहे. पोलिसांनी मात्र अफवा पसरवू नका, कायदा आपल्या हातात घेऊ नका असे आवाहन केले आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??