क्राईम न्युज

लोणी काळभोर पोलीसांची मोठी कारवाई : अमली पदार्थ विक्रेत्यावर २ वर्षांची हद्दपार कारवाई ; सर्वेलन्स पथकाची अचूक अंमलबजावणी…

लोणी काळभोर (ता. हवेली) : परिसरात वाढत असलेल्या अमली पदार्थ विक्रीला आळा घालण्यासाठी लोणी काळभोर पोलीसांनी निर्णायक पाऊल उचलत एका सराईत आरोपीवर दोन वर्षांसाठी हद्दपार (तडीपार) कारवाई केली आहे. या कारवाईमुळे स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा धक्का बसला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेरखान सुधाखान पठाण (वय ५१, रा. किरण बेकरी जवळ, लोणी स्टेशन, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) हा अमली पदार्थ विक्री प्रकरणात रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. त्याच्या सततच्या बेकायदेशीर हालचाली व परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली.

पोलीस उपायुक्त, परिमंडळ ६, पुणे शहर यांच्या कार्यालयाकडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(अ)(ब) अंतर्गत तडीपार आदेश क्रमांक १७/२०२६, दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आला. या आदेशानुसार आरोपीस पुणे शहर, पुणे ग्रामीण तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करत लोणी काळभोर पोलीसांनी दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला सातारा जिल्ह्यातील फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत त्याच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आले. यावेळी तडीपार आदेशाची काटेकोरपणे बजावणी करण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस हवालदार विलास शिंदे (३७११), वैजिनाथ शेलार (३१७०), पोलीस अमलदार प्रशांत नरसाळे (८९०७) तसेच महिला पोलीस अमलदार योगिता भोसुरे (९४८७) आणि सर्वेलन्स विभागातील पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

पोलीसांनी स्पष्ट केले की, अमली पदार्थ विक्री, बेकायदेशीर धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. अशा कारवायांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होत आहे.

दरम्यान, नागरिकांनी देखील पोलीस प्रशासनाला सहकार्य करत परिसरात कुठेही अमली पदार्थ विक्री, संशयास्पद हालचाली किंवा गुन्हेगारी प्रकार आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??