देश विदेशराजकीय

आसवनी प्रकल्पांचे मल्टिफीड मध्ये रूपांतर केल्यास वर्षभर इथेनॉलचे उत्पादन शक्य – हर्षवर्धन पाटील..

पुणे येथे हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर संकुलमध्ये बैठक संपन्न.. देशभरातील अधिकारी व तज्ञांची बैठकीस उपस्थिती...

डॉ गजानन टिंगरे

पुणे (इंदापूर) : आगामी काळात इथेनॉलचे उत्पादन हे धान्याचा वापर करून वर्षभर घेता येणार आहे, त्याचा आर्थिक फायदा कारखान्यांना होणार आहे. त्यासाठी साखर कारखान्यांनी सध्याच्या आसवनी प्रकल्पांचे मल्टिफीड मध्ये रूपांतर केल्यास वर्षभर इथेनॉलचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे येथे शुक्रवारी केले.

           पुणे येथील साखर संकुलमध्ये देशातील इथेनॉल उत्पादन वाढीसाठी कोणती पाऊले उचलावीत यावर विचार करणेसाठी देशभरातील सहकार क्षेत्रात काम करणारे अधिकारी व तज्ज्ञांची बैठक राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

        या बैठकीस राज्याचे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे उपसचिव सुरेशकुमार नायक, केंद्रीय सहकारिता मंत्रालयाचे संचालक डी. के. वर्मा, एन.सी.डी.सी.चे संचालक गिरीराज अग्निहोत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक, देशभरातील सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक, राज्य साखर संघांचे व्यवस्थापकीय संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.

         हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, इथेनॉल उत्पादनास गती यावी यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली, केंद्रीय सहकार मंत्रालय,अन्न मंत्रालय आणि पेट्रोलियम मंत्रालय हे संयुक्तपणे कार्यरत आहेत. देशातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुमारे मार्च-एप्रिल पर्यंत चालतात. मात्र त्यानंतर इथेनॉलचे उत्पादन चालू ठेवायचे असेल तर ते धान्यावर चालवावे लागणार आहे. मका हे कमी पाण्यात व वर्षातील सर्व तिन्ही हंगामात येणारे पीक आहे. सहकार क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी केंद्रीय सहकारिता मंत्रालयाने आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधारणा करण्याचा आणि त्याद्वारे अन्न-धान्य विशेषत मक्यापासून इथेनॉलचे उत्पादन घेतल्यास इथेनॉल प्रकल्प वर्षभर चालतील आणि त्यातून कारखान्यांना आर्थिक स्थर्य प्राप्त होण्यास मदत मिळेल,असे त्यांनी सांगितले.

            देशातील ऑइल कंपन्या याबाबत साखर कारखान्यांशी दीर्घ मुदतीचे करार करण्याबाबत अनुकूल आहेत. तसेच उत्पादित इथेनॉलची खरेदी सहकारी आसवनींकडून प्रथम प्राधान्याने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहितीही राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिली.

आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधारणा करणेसाठी अर्थसहाय्य मिळावे यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने पुढाकार घेतला आहे. भारत सरकारकडून यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय सहकारी विकास निगमने (एन.सी.डी.सी.) यासाठी व्याज सवलतीत मुदत कर्ज देण्याचे मान्य केले आहे, अशी माहितीही एन.सी.डी.सी.चे संचालक असलेले राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??