जिल्हासामाजिक

“शताब्दी चषक” क्रिकेट स्पर्धेने हवेली शिक्षक को.ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शतक महोत्सवी वर्षाची दिमाखदार सुरुवात…

तुळशीराम घुसाळकर

लोणी काळभोर (ता. हवेली) : जीवनात खेळातील सहभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समस्यांना सामोरे जात आपल्या ध्येयाकडे आणि खेळाकडे लक्ष केंद्रित करणारा खेळाडूच यशस्वी ठरतो. आज प्रत्येक खेळामध्ये अनेक क्रांतिकारक बदल होत असून, खेळाडूची शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व त्याला वेगळी ओळख देतात, असे प्रतिपादन हवेली तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी हेमंतकुमार खाडे यांनी केले.

हवेली तालुका प्राथमिक शिक्षक को.ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शताब्दी वर्षानिमित्त तालुकास्तरीय भव्य “शताब्दी चषक” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन हेमंतकुमार खाडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी शिक्षकांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांतही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

या स्पर्धेत हवेली तालुक्यातील विविध विभागांतील शिक्षक संघांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. सामने अत्यंत चुरशीचे व रंगतदार झाले. अंतिम सामन्यात पश्चिम हवेलीतील सिंहगड टायगर्स संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत नगर रोडच्या शिवनेरी पँथर्स संघावर मात करून विजेतेपद पटकावले. शिवनेरी पँथर्स संघ उपविजेता ठरला, तर पूर्व हवेलीच्या पुरंदर वॉरियर्स संघाने तृतीय क्रमांक मिळवला.

स्पर्धेच्या निमित्ताने सर्व खेळाडूंना संस्थेच्या वतीने टी-शर्टचे वाटप करण्यात आले. संस्थेचे चेअरमन दिगंबर सुपेकर यांनी सर्व खेळाडू, पंच, संयोजक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. संघांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेश काळभोर यांच्या हस्ते मालिकावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच हवेली शिक्षक संघाचे आजी-माजी पदाधिकारी रमेश कुंजीर, जयवंत मोहितेसुरेश कटके यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देऊन खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

विजेत्या संघातील सर्व खेळाडूंना संस्थेच्या संचालकांच्या हस्ते मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेसाठी हवेली तालुक्यातील शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता. शतक महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीलाच आयोजित करण्यात आलेल्या या भव्य क्रीडा स्पर्धेमुळे शिक्षकांमध्ये उत्साहाचे व एकोप्याचे वातावरण निर्माण झाले. पारितोषिक वितरणानंतर संस्थेचे सचिव ग. प्र. जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??