क्राईम न्युज

मित्राकडून घेतलं सोनं, गहाण ठेवल्याने निर्माण झाला जीवघेणा वाद!

                                 फोटो – सोशल‌ मिडीया

पुणे (हवेली) : लग्नात घालावयाचे आहेत असे कारण सांगून मित्रांकडून घेतलेले साडेसतरा तोळे सोन्याचे दागिने एका खाजगी फायनांन्समध्ये गहाण ठेऊन १० लाख रुपये घेतले. मित्राने दागिने परत मागीतले म्हणून त्यालाच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अक्षय गोविंद चौधरी (वय ३१, रा. सोरतापवाडी ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाश दिलीप काळभोर (वय २७, रा. सिद्राममळा, लोणी काळभोर ता. हवेली) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश काळभोर व अक्षय चौधरी हे दोघेजण मित्र आहेत. दोघांमध्ये रोख व ऑनलाईन स्वरुपात पैशाची देवाण घेवाण होत होती. १५ एप्रिल रोजी आकाश याने अक्षय याला फोन करून नातेवाईकांच्या लग्नाला जायचे आहे. त्यासाठी तुझे आणि तुझ्या आईचे सोन्याचे दागिने लग्नामध्ये घालण्याकरीता हवे आहेत. लग्न झाल्यानंतर ते दागिने तुला दोन ते तीन दिवसांमध्ये परत करतो असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सोळा लाख रुपये किंमतीचे साडेसतरा तोळे सोन्याचे दागिने अक्षय चौधरी यांनी आकाश काळभोर याला मित्र यश अशोक यादव याच्या समक्ष लोणी काळभोर या ठिकाणी राहत असलेल्या घरी जाऊन दिले होते. लग्न झाल्यानंतर २२ एप्रिल रोजी आकाश याला दिलेले दागिने अक्षय यांनी परत मागितले असता आकाश याने सोन्याचे दागिने देण्यास टाळाटाळ केली. यासंदर्भात अक्षय याने वारंवार फोन केला परंतु आकाश याने फोन घेण्याचे टाळले. त्यामुळे त्याच्या घरी जाऊन चौकशी केली असता तो घरी सापडला नाही. त्यामुळे त्याच्या राहत्या घरातुन त्याला फोन केला. यावेळी आकाशने फोन उचलुन “तु माझ्या घरी का गेला, मी तुझ्या कडे बघतोच आता, तुझे सोन्याचे दागिने आता परत करणार नाही, तुला काय करायचे ते कर, पोलीसात जरी केला तरी मला फरक पडणार नाही” असे म्हणुन अक्षय चौधरीला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर अक्षय याने केलेल्या चौकशीत आकाश याने दागिने हे कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एका खाजगी फायनांन्सकडे १० लाख ५ हजार गहाण ठेवल्याची माहिती पुढे आली. यांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य संपादक सुनिल थोरात 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??