जिल्हासामाजिक

शिवसेना व राजे क्लब ट्रस्टच्या वतीने सामाजिक जागरूकता आणण्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन ; शेवाळेवाडी…

पुणे (हडपसर) : निबंध स्पर्धेत सहभागी होऊन स्वतःला व्यक्त होण्याची आणि आपले विचार मांडण्याची संधी राजे क्लब या सामाजिक संस्थेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली होती. निबंध स्पर्धेसाठी “भारताचा खरा शत्रू कोण?”, “सध्याच्या राजकारणामध्ये सुशीक्षीत तरुणांची भूमिका” व “हुंडा-एक शापित आशीर्वाद” यापैकी एका विषयावर स्पर्धकांनी त्यांचे विचार मांडायचे होते.

६ जून पर्यंत स्पर्धकांनी त्यांचे निबंध ऑनलाइन पद्धतीने राजे क्लब ट्रस्ट च्या अधिकृत ई-मेल आयडीवर पाठवायचे होते. यामध्ये सुमारे २५० स्पर्धकांनी संपूर्ण महाराष्ट्रातून सहभाग नोंदविला होता.

या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. अस्मिता सागर पळशीकर व डॉ. रसिका अभिषेक ताकवणे यांनी पटकाविला. तसेच द्वितीय क्रमांक चि. आर्यन चंद्रकांत कदम व श्री. प्रशांत बोरे आणि तृतीय क्रमांक सौ. अमृता संदीप पंडित व केतकी चोपडे याना मिळाला. १४ जून रोजी विजेत्या स्पर्धकांना राजे क्लबच्या वतीने रोख रक्कम व सन्मान चिन्ह बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच चांगले निबंध लिहिलेल्या ४० स्पर्धकांना उत्तेजनार्थ सन्मान चिन्ह आयोजकांच्या वतीने देण्यात आले.

बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी महिला आघाडी पुणे जिल्हाध्यक्षा ममता शिवतारे-लांडे, हडपसर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले, मांजरी मा. सरपंच शिवराज घुले, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख तुषार हंबीर, युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष गणेश कामठे, शिवसेना नेत्या निर्मला मेमाणे, हेमलता पडवळकर, राजे क्लब महिला बचत गट पदाधिकारी व सदस्य, भुजंगराव शेवाळे, बाळासाहेब भंडारी, विजय सोनवणे, ज्ञानेश्वर कटरे, दीपक ढोरे, निबंध स्पर्धेमधील विजेते व राजे क्लब चे सर्व सदस्य  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी विविध कलागुण अंगीकृत केले पाहिजे आणि असे उपक्रम नक्कीच त्यासाठी हातभार लावत आहेत असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले म्हणाले.

या स्पर्धेच्या निमित्ताने नागरिकांना विविध विषयांवर निष्कर्ष काढण्याची संधी मिळणार असून समाज सुदृढ होण्यास हातभार लागेल असा विश्वास आम्हाला वाटतो असे शेवाळवाडी गावचे माजी उपसरंच अमित पवार म्हणाले.

सर्व निबंधांचे एक छोटेसे पुस्तक तयार करून विद्यार्थ्यांना ते उपलब्ध करून द्यावे असे ममता शिवतारे लांडे म्हणाल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विशाल बावणे यांनी केले व आभार अर्चना पवार यांनी मानले.

मुख्य संपादक सुनिल थोरात 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??