क्राईम न्युज

ऊरुळी कांचन परिसरातील डॉक्टर अपहरण व खंडणी प्रकरण उघड…

४८ तासांत चार आरोपी जेरबंद; १५.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत...

तुळशीराम घुसाळकर

ऊरुळी कांचन (ता. हवेली) : ऊरुळी कांचन परिसरातील एका डॉक्टरचे अपहरण करून तब्बल १९ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीतील चार आरोपींना अवघ्या ४८ तासांत अटक करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व ऊरुळी कांचन पोलीस स्टेशनला यश आले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची इरटीगा कार व खंडणीची रोकड असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणी ऊरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. ०९/२०२६ बी.एन.एस. कलम १४०(२), १४०(३), १२६(२), १२७(२), ११५(२), ११७(२), ३५१(३), ३०८(२), ३०८(३), ३(५) अन्वये दि. १४ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपहरणाची थरारक घटना…

फिर्यादी डॉ. विठ्ठल किसन चौधरी (वय ५८, व्यवसाय – डॉक्टर, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) हे दि. १० जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता सुमारास सोलापूर-पुणे महामार्गाने ऊरुळी कांचनहून कुंजीरवाडी येथे जात असताना इनामदार वस्ती परिसरात त्यांच्या कारसमोर पांढऱ्या रंगाची इरटीगा कार आडवी लावण्यात आली. इरटीगा कारमधील चार अनोळखी आरोपींनी चाकूचा धाक दाखवून डॉक्टरांचे अपहरण केले व त्यांना मारहाण करत शिंदवणे बाजूकडे नेले.

आरोपींनी सुरुवातीला ४ लाख रुपये खंडणी घेऊन डॉक्टरांना चौफुला येथे सोडले. मात्र त्यानंतर आणखी १५ लाख रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी डॉक्टरांनी दि. १२ जानेवारी २०२६ रोजी उर्वरित रक्कम दिली. एकूण १९ लाख रुपये खंडणी आरोपींनी उकळली.

ड्रायव्हरच निघाला सूत्रधार…

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल (पुणे ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व ऊरुळी कांचन पोलीस स्टेशनची दोन विशेष पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान फिर्यादी डॉक्टरांच्या ड्रायव्हरवर संशय बळावला. चौकशीत राजेंद्र छगन राजगुरु (वय ३२, रा. अनंतपूर, पैठण, जि. छ. संभाजीनगर) याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला.

त्याच्या कबुलीनंतर व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुढील आरोपींना अटक करण्यात आली. संतोष सोमनाथ बनकर (वय ३६)
दत्ता ऊर्फ गोटू बाळू आहेर (वय ३४)
सुनील ऊर्फ सोनू मुरलीधर मगर (वय ३०)
सर्व आरोपी हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

मुद्देमाल जप्त; पोलीस कोठडी मंजूर…

आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली इरटीगा कार (किंमत अंदाजे ८ लाख रुपये) तसेच खंडणीची रोकड ७ लाख ८० हजार रुपये असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दि. २० जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. आरोपी सुनील मगर याच्यावर यापूर्वी मालमत्ता चोरीचे तीन गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे.

पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी… 

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस (दौंड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो.नि. सचिन वांगडे, सपोनि ज्ञानेश्वर बाजीगरे यांच्यासह अनेक अधिकारी व अंमलदारांनी या यशस्वी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर बाजीगरे, ऊरुळी कांचन पोलीस स्टेशन करत आहेत.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??