क्राईम न्युजजिल्हाताज्या घडामोडी

दहशत माजवणारा गुंड टिपू पठाण याची लाखो रुपयांची मालमत्ता उघड ; अवैध बांधकामावर फिरला बुलडोजर…

काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

पुणे : काळेपडळ पोलिसांनी हडपसर परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुंड टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर मोठी कारवाई करत लाखो रुपयांच्या मालमत्तेचा पर्दाफाश केला आहे. गुंडगिरी व अवैध मार्गाने संपत्ती मिळवल्याप्रकरणी पठाण व त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा काळेपडळ पोलीस स्टेशन गु.र.नं. 100/2025 भा.न्या.स. कलम 308(2), 329(3), 351(2), 352, 189(1), 189(2), 191(2), 61(2), 111 तसेच मोक्का कलम 3(1)(II), 3(2), 3(4), 23(1)(A) प्रमाणे नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

तपासादरम्यान टिपू पठाण व त्याच्या टोळीने अवैध मार्गाने लाखो रुपयांची मालमत्ता कमावल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी पठाणच्या नावावर असलेली एक इनोव्हा कार, तीन दुचाकी वाहने आणि सय्यदनगर परिसरातील अनाधिकृत कार्यालयाचे बांधकाम यावर कारवाई करत महानगरपालिकेच्या मदतीने बुलडोजर फिरवला.

घरझडतीदरम्यान पोलिसांना विविध जागेची कागदपत्रे, सोन्याचे दागिने आणि महागड्या वस्तू मिळाल्या आहेत. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे (परिमंडळ ५) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पो.नि. अमर काळंगे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पो.हवा. प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर आणि महादेव शिंदे यांनी सहभाग घेतला.

या प्रशंसनीय कारवाईबद्दल काळेपडळ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??