क्राईम न्युजजिल्हामहाराष्ट्रसामाजिक

दारूबंदी कायद्याचा भंग; राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली १ कोटींच्या साठ्यावर कारवाई…

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची मोठी कारवाई ; कोट्यवधींचा दारूसाठा जप्त...

पुणे : (दि.१२) राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाच्या भरारी पथकाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत सासवड गावच्याहद्दीत वीर फाटा जेजुरी-सासवड रोड, पुरंदर येथे १ कोटी ३३ लाख ७८ हजार ४०० रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे,अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे.

याबाबत सासवड विभागाच्या पथकाने सापळा रचून संशयित वाहन टाटा कंपनीचा एलपीटी (१२१२) सहाचाकी माल वाहतूक कंटेनर क्र. MH-४९-एटी-३४७१ वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा राज्य बनावटीचे रॉयल ब्लु माल्ट व्हीस्की मद्याचे १८० मि.ली क्षमतेच्या प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटल्या या प्रमाणे एकूण १२०४ बॉक्स (५७ हजार ७९२ बाटल्या) अशा प्रकारे एकुण रुपये १ कोटी १५ लाख ५८ हजार ४०० हजार इतक्या किंमतीचा मद्यसाठा, वाहन व मोबाईलसहीत एकुण १ कोटी ३३ हजार ७८ हजार ४०० रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये वाहनचालकाविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ तील कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत उपअधीक्षक संतोष जगदाळे, निरीक्षक संभाजी बरगे यांनी सहभाग घेतलेला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक संभाजी बरगे हे करीत आहेत.

जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध नियमित कारवाई सुरु राहणार असून कोणत्याही नागरिकास अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी टोल फ्री. क्रमांक. १८००२३३९९९९ व दुरध्वनी क्रमांक ०२०-२६०५८६३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मुख्य संपादक श्री सुनिल थोरात

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??