जिल्हासामाजिक

मोजे–थेऊर फाटा येथे भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त सलग पाचव्या वर्षी भव्य अन्नदान; सिद्धार्थ संघ तरुण मंडळाचा समाजोपयोगी आदर्श…

लोणी काळभोर (ता. हवेली) : भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या निमित्ताने मोजे–थेऊर फाटा येथे सिद्धार्थ संघ तरुण मंडळ यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सलग २०१९ पासून राबविण्यात येणारा अन्नदान उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. भीमा कोरेगाव येथे मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या हजारो भीमसैनिकांच्या सेवेसाठी चहा, बिस्किटे, पोहे, वडापाव तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वितरण करण्यात आले. यावर्षी साधारण पाच ते सहा हजार भीमसैनिकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला.

या उपक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्त्या शितलताई सुजित कांबळे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. त्यांना संजय भीमराव भालेराव, भोलेनाथ शेलार (माजी सरपंच, लोणी काळभोर), प्रल्हाद सिताराम कांबळे, विनायकाअण्णा कांबळे, दिनेश शंकर कांबळे, दिगंबर अर्जुन जोगदंड, अजित भालेराव, नईम इनामदार, मिलिंद कांबळे, महेश जैनजांगडे, राकेश शेलार, अनिल भालेराव, नारायण गजरमळ तसेच अनिल कांबळे (माजी डीवायएसपी) आदींनी मोलाचे सहकार्य केले. सिद्धार्थ संघ तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पहाटेपासूनच सेवेसाठी तैनात होते.

या अन्नदान कार्यक्रमाला गावातील व परिसरातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. प्रमुख उपस्थितीमध्ये लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तात्या तुपे, युगंधर काळभोर (हवेली पंचायत समिती उपसभापती), राहुल काळभोर (महाराष्ट्र केसरी), योगेश नाना काळभोर (यशवंत सहकारी साखर कारखाना, थेऊर – संचालक), गुरुदेव आबा काळभोर (चेअरमन, विकास सोसायटी लोणी काळभोर), हरीश गोटे (सरपंच, कुंजीरवाडी), राजेंद्र आबा काळभोर (माजी उपसरपंच, लोणी काळभोर), अमित भाऊ काळभोर, ॲड. बाळासाहेब दाभाडे, रमेशजी भोसले (संचालक, विकास सोसायटी लोणी काळभोर), संतोष भोसले, श्रीकांत काळभोर (पुणे जिल्हा अध्यक्ष, रयत क्रांती), ॲड. श्रीकांत भिसे, अमोल टेकाळे, प्रकाश भिसे, सोनाली जवळकर (पोलीस पाटील, आळंदी म्हातोबाची), दादा पाटील काळभोर (पोलीस पाटील, लोणी काळभोर) यांचा समावेश होता.

भीमा कोरेगाव शौर्यदिन हा स्वाभिमान, संघर्ष आणि सामाजिक समतेचा प्रतीक मानला जातो. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ मानवंदनेसाठी येणाऱ्या भीमसैनिकांची सेवा करणे, हेच या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले. जात, धर्म, पंथ न पाहता सर्वांसाठी अन्नदान करून सिद्धार्थ संघ तरुण मंडळाने सामाजिक सलोखा व बंधुभावाचा संदेश दिला आहे.

सलग अनेक वर्षे कोणताही गाजावाजा न करता सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमामुळे सिद्धार्थ संघ तरुण मंडळाची परिसरात वेगळी ओळख निर्माण झाली असून, त्यांच्या या समाजोपयोगी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भविष्यातही असेच उपक्रम राबवून समाजासाठी काम करण्याचा संकल्प मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??