क्राईम न्युज

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव बल्कर मिक्सरची स्विफ्ट डिझायरला धडक, चालक फरार…

उरुळी कांचन : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (दि. १५ मे) सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका स्विफ्ट डिझायर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोरतापवाडी गावच्या हद्दीत वाकडापूल पेठ नाका परिसरात भरधाव वेगातील बल्कर मिक्सर वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मात्र अपघातानंतर संबंधित मिक्सर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत कैलास भागचंद कटारीया (वय ५७, व्यवसाय सेवानिवृत्त, रा. आदिनाथ सोसायटी, मार्केट यार्ड, पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा क्रमांक 117/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 281, 324(5) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134 आणि 177 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास कटारीया हे शुक्रवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार (एमएच 12 एक्स क्यू 5256) घेऊन पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करत होते. ते सोरतापवाडी हद्दीतील वाकडापूल पेठ नाका परिसरात आले असता पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या बल्कर मिक्सर वाहनाने (एमएच 12 टीव्ही 0467) त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.

मिक्सर चालकाने सुरक्षित अंतर न ठेवता निष्काळजीपणे वाहन चालवल्याने ही धडक इतकी जोरदार होती की, कटारीया यांची कार पुढे असलेल्या बल्कर वाहनाला (एमएच 12 एक्सएम 3728) जाऊन धडकली. त्यामुळे स्विफ्ट डिझायर कारचा पुढील आणि मागील भाग अक्षरशः चेंगरला गेला. गाडीचे बोनेट, इंजिन तसेच इतर भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातात मिक्सर वाहनाचेही नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक मंदावली होती. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. मात्र अपघात घडल्यानंतर संबंधित मिक्सर चालक घटनास्थळावरून फरार झाला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत. प्रभारी अधिकारी सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??