जिल्हासामाजिक

गणपती मंदिरांत ड्रेसकोड, दर्शनाला जाताना पुरुषांनी सभ्य अन् महिलांनी पारंपरिक वस्त्रे घालण्याची नियमावली, वाचा सविस्तर…

पुणे : अष्टविनायकांपैकी मोरेगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी व सिद्धटेकच्या सिद्धिविनायकासह इतर २ गणपती मंदिरांसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टने वस्त्रसंहिता जारी केली आहे. या संहितेनुसार, या गणपतींच्या दर्शनासाठी येणाऱ्या पुरुष भाविकांना सभ्य पोशाख परिधान करावा लागणार आहे.

तर महिलांनाही पारंपरिक पोशाख किंवा मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असणारे आदरयुक्त वस्त्र परिधान करावे लागणार आहेत.

चिंचवड देवस्थान ट्रस्टकडे मोरेगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी व सिद्धटेकच्या सिद्धिविनायक या अष्टविनायकांपैकी ३ मंदिरांसह चिंचवडचा मोरया गोसावी संजीवन मंदिर व खार नारंगी मंदिराचे नियंत्रण आहे. त्यानुसार, या ट्रस्टने या पाचही गणपती मंदिरांसाठी वस्त्रसंहिता लागू करत भाविकांसाठी पोशाख नियमावली जारी केली आहे. ट्रस्टने ही नियमावली म्हणजे सक्ती नसून, आम्ही भाविकांना मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनाला न येण्याची विनंती आहे, असे स्पष्ट केले आहे.

ट्रस्टने आपल्या पत्रात म्हटले आहे की, संपूर्ण श्रद्धा व भक्तीभावाने महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे व श्री मंगलमूर्ती वाडा येथे दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने विनम्र विनंती करण्यात येत आहे. महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे व श्री मंगलमूर्ती वाडा या केवळ वास्तू नसून, ते संस्कृती आणि भक्तीचा केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताने मंदिराच्या पवित्रतेचा आदर राखावा. भक्तीपर वातावरण टिकवण्यासाठी सहकार्य करावे.

आपली उपस्थिती आणि वर्तन मंदिराच्या शुद्धतेला अनुसरून असावे यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. मंदिराच्या पवित्रतेचा सन्मान राखण्यासाठी, चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे वस्त्रसंहिता लागू करण्यात येत आहे. श्रींच्या मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांनी मंदिरात प्रवेशासाठी खालीलप्रमाणे योग्य पोशाख परिधान करावा.

                                काय परिधान करावे

पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख परिधान करावा. शर्ट, टी-शर्ट आणि पूर्ण पँट किंवा धोतर, कुर्ता पायजमा असा मंदिराच्या पवित्रतेला साजेसा पोशाख परिधान करावा.
महिलांनी साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा. मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे.
कुणीही अतिआधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, टोकदार, स्लीव्हलेस, फाटके, शरीरप्रदर्शन करणारे अथवा अनौपचारिक कपडे मंदिर प्रांगणात परिधान करू नये.

उल्लेखनीय बाब म्हणजे, अष्टविनायक यात्रा महाराष्ट्रातील गणपती दर्शनासाठी प्रसिद्ध असलेली यात्रा आहे. पुण्यापासून सुमारे ८५० किलोमीटर प्रवास करत रायगड आणि पुणे जिल्ह्यातील श्री गणेश मंदिरांचे दर्शन भाविकांना करायला मिळते. या यात्रेसाठी जवळपास २ दिवस आणि १ रात्र एवढा कालावधी लागतो. या यात्रेत परंपरेनुसार मोरेगावच्या मोरेश्वराचे सर्वप्रथम दर्शन घेतले जाते. त्यानंतर पुढील ४ मंदिरे पुण्यापासून खूप दूर आहेत. मोरेश्वर मोरेगाव, सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि पुण्यातील रांजणगावचा गणपती आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??