क्राईम न्युज

डीसीपी ऋषिकेश रावले यांच्या कारवाईचा ‘शतक’ पार; ११ महिन्यांत १०३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई…

बुधवार पेठेत कॉम्बिंग ऑपरेशन ; ६ बांगलादेशी महिलांना ताब्यात

पुणे : शहर पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार शनिवारी (२४ मे) रात्री पुणे शहरात विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी फरासखाना पोलिस स्टेशनखडक पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने बुधवार पेठ परिसरातील सागर बिल्डिंगवर छापा टाकून भारतात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ६ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस उपायुक्त (झोन १) ऋषिकेश रावले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. चौकशीदरम्यान संबंधित महिलांनी सुरुवातीला ब्युटी पार्लर, शिवणकाम तसेच घरगुती कामासाठी भारतात आणल्याचे सांगितले. मात्र बुधवार पेठेत आल्यानंतर त्या स्वेच्छेने वेश्याव्यवसाय करू लागल्याचे उघड झाले आहे.

या महिलांना भारतात आणणारे दलाल कोण आहेत, त्यांनी सीमा कशी ओलांडली, तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे कशी मिळवली याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांमध्ये कल्पना कमल शेख (वय ३८), राणी रफिक शेख (वय ४२), लकी हालेंग मंडल (वय ४०), पूजा रफिक शेख (वय २०), रुमा जानी शेख (वय ३०) आणि निशी शाहजहान ढाली (वय २९) यांचा समावेश आहे. या सर्व महिला बुधवार पेठ परिसरात वास्तव्यास होत्या. त्यांचे मूळ गाव बांगलादेशातील विविध भागांत असल्याचे तपासात समोर आले आहे.

विशेष म्हणजे, डीसीपी ऋषिकेश रावले यांनी झोन १ चा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकां विरोधातील कारवाईला वेग आला आहे. गेल्या ११ महिन्यांत तब्बल १०३ बांगलादेशी नागरिकांना पकडून त्यांच्यावर निर्वासनाची कारवाई करण्यात आली असून, हा आकडा शंभरच्या पुढे गेला आहे.

दरम्यान, डीसीपी ऋषिकेश रावले हे एका महिन्याच्या विशेष प्रशिक्षणासाठी हैदराबाद येथे रवाना होत असून जून अखेर ते पुण्यात परतणार आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त कार्यभार डीसीपी मुख्यालय पी. आर. पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??