क्राईम न्युज

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे हात महिला पोलिसाच्या रक्ताने ; अश्विनी बिंद्रे-गोरे हत्याकांडात नऊ वर्षांच्या संघर्षाला यश…वाचा सविस्तर..

अश्विनी बिद्रे या पोलीस दलातील एक धाडसी महिला अधिकारी म्हणून ओळखला जात...

मुंबई : अख्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अश्विनी बिंद्रे-गोरे हत्याकांडात नऊ वर्षानंतर न्यायालयाने आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर अखेर दोषी ठरले.

या प्रकरणातील राजू पाटील या अरोपीची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुख्य कुरुंदकर यानेच आपल्या साथीदारांसह अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेल सत्र न्यायालयाने कुरुंदकर याला दोषी ठरवले.

फेसबुक  – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL

अश्विनी बिंद्रे यांचे कळंबोली येथून २०१५ मध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती. याबाबत स्थापन केलेल्या एसआयटीने ८० जणांची साक्ष घेत कुरुंदकर याच्यासह तिघांवर खूनाचा ठपका ठेवला होता. तपास अधिकारी निलेश राऊत आणि संगीता अल्फान्सो यांनी केलेल्या तपासात कुरंदकर यांनी अश्विनी बिंद्रे यांचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार कुरुंदकर यांच्यासह राजू उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय पाटील, कुंदन भंडारी आणि महेश पडळकर या चौघांची रवानगी तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. आता या प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने कुरुंदकर याच्यासह दोघांना दोषी ठरवले आहे. तर या प्रकरणात ११ एप्रिल रोजी निकाल देण्यात येणार आहे.

                         नऊ वर्षांच्या संघर्षाला यश…

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचा ११ एप्रिल २०१६ रोजी मुंबईत खून झाला. याप्रकरणी शनिवारी सुनावणी झाली. आता या प्रकरणाला ११ तारखेला नऊ वर्ष होत असल्यानेच ११ एप्रिल २०२५ रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. दिवंगत अश्विनी यांचे पती राजू गोरे आणि मुलगी सिद्धी यांनी नववर्ष केलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. पण न्यायालय या प्रकरणात कोणती शिक्षा सुनावणार याकडे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. पती राजू गोरे यांनी तपासादरम्यान दर आठवड्याला सुनावणीसाठी पनवेल जात असत. तसेच या प्रकरणात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतींशी पत्रव्यवहार करत लक्ष वेधण्याचे काम केलं होतं.

हातकलंगले तालुक्यातील आळते येथील अश्विनी बिद्रे या पोलीस दलातील एक धाडसी महिला अधिकारी म्हणून ओळखला जात होत्या. नोकरीला लागण्याच्या आधी त्यांचा हातकणंगले येथील महाराष्ट्र नव निर्माण सेना पक्षाचे कार्यकर्ते असणाऱ्या राजू गोरे यांच्याशी २००५ मध्ये विवाह झाला होता. विविहाच्या एका वर्षातच त्यांना MPSC च्या स्पर्धा परीक्षेत यश आले होते. तर त्या पोलीस उपनिरीक्षक बनल्या होत्या.

ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08

२००६ मध्ये त्यांची पहिली पोस्टिंग पुण्यात झाली होती. यानंतर सांगली आणि रत्नागिरीत देखील त्यांनी काम केलं होतं. तर त्या पोस्टींगवर मुंबईतील कळंबोली येथे दाखल झाल्या होत्या. येथूनच त्यांचे अपहरण झाले होते. जेथून हे प्रकरण उघडकीस आले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे आणि या हत्याकांडातील बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांची पहिली भेट सांगलीत झाली होती. याच ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि त्या मैत्रीचे रूपांतरनंतर प्रेमसंबंधात झाले होते. याच्यातूनच बिद्रे आणि त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला होता. तर याच मुद्द्यासह लग्नाच्या तकाद्यावरून कुरुंदकर यांच्याशीही अश्विनी बिद्रेंचा वाद झाला होता. याच वादातून अश्विनी बिद्रेंची हत्या झाल्याचेनंतर एसआयटी तपासात समोर आले होते.

कळंबोली येथून अश्विनी बिद्रे यांचे २०१५ मध्ये अपहरण झाले होते. यानंतर अश्विनी बिद्रे यांच्याशी कोणताच संपर्क होत नसल्याने पती राजू गोरे आणि मुलगी सिद्धी चिंतेत होते. त्यांनी तक्रार देण्याच्या आधी अश्विनी बिद्रे कर्तव्यावर असणाऱ्या कळंबोली पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली होती. मात्र त्यांना काही माहिती न मिळाल्याने त्यांनी अश्विनी बिद्रे यांच्या मिसींगची तक्रार दिली होती. तसेच अश्विनी बिद्रे ज्या फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्याचे कुलूप तोडून मोबाईल व लॅपटॉपची तपासणी केली होती.

या तपासणीतून अश्विनी बिद्रे आणि या हत्याकांडातील बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या संबंधाची माहिती समोर आली होती. यानंतरच अश्विनी बिद्रे यांच्या जीवाचे काहीतरी बरे वाईट झाल्याच्या संशयावरून कळंबोली पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती.

या फिर्यादीत पोलीस निरीक्षक कुरुंदकर यांच्यासह राजू पाटील, महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र राजकीय नेत्यांशी असलेले लागेबांध यामुळे बिद्रे आणि गोरी कुटुंबीयांवर प्रचंड दबाव आणला गेला. पण हा दबाव झुगारून राजू गोरे यांनी दर आठवड्याला पनवेल आणि मुंबई सुनावणीसाठी फेऱ्या मारल्या. इतकंच नाही तर तत्कालिन मुख्यमंत्र्यांची आणि राज्यपाल यांची भेट घेऊन दाद मागितली होती. त्यांच्या या संघर्षाला आता नऊ वर्षानंतर यश आले असून पनवेल न्याय दिलाय. न्यायालयाने आरोपी बडतर्फ पोलीस निरीक्षक कुरुंदकर यांना दोषी ठरवले आहे. आता या प्रकरणात ११ एप्रिल रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे

                              अभय कुरुंदकर हा मूळचा कोल्हापूरचा…

बडतर्फ पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. तो आजरा तालुक्यातील असून त्याचे कोल्हापूर शहरातील सम्राट नगर परिसरात आलिशान बंगला आहे. तसेच गावाकडे शेत जमीन आणि मोठे घर देखील आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री अमोल रजपूत 8169324814 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??