जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

‘प्रोजेक्ट गरुडा’ची इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

‘एमआयटी एडीटी’च्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील सर्वात मोठ्या आरसी इलेक्ट्रिक विमानाची निर्मिती

हवेली, पुणे : एमआय टी आर्ट, डिझाईन अँन्ड टेक्नाँलाँजी युनिव्हर्सिटी च्या विद्यार्थ्यांनी भारतीय एरोस्पेस संशोधन क्षेत्रात ऐतिहासिक ठरणारी कामगिरी करत भारतातील सर्वात मोठे रेडिओ-कंट्रोल्ड (आरसी) इलेक्ट्रिक फिक्स्ड-विंग विमान यशस्वीरीत्या डिझाईन, विकसित आणि उड्डाण केले आहे. ‘टीम स्कायट्रेक’ ने विकसित केलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘प्रोजेक्ट गरुडा’ असे नाव देण्यात आले असून, या प्रकल्पाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये अधिकृत नोंद करण्यात आली आहे. पूर्णपणे विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या विमानाने भारतातील सर्वाधिक वजनाचे तसेच सर्वात मोठ्या विंगस्पॅनचे आरसी इलेक्ट्रिक विमान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड सायन्स अंतर्गत एरोस्पेस इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी हे विमान पूर्णपणे स्वतः विकसित केले आहे. ‘सेंटर फॉर रिसर्च, इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप फॉर यंग अॅस्पिरंट्स’ (क्रिया) यांच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी तब्बल ४८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विमानाची रचना, स्ट्रक्चरल फॅब्रिकेशन, एरोडायनॅमिक्स विश्लेषण, पिक्सहॉक फ्लाइट कंट्रोलर प्रणाली, आरटीके-जीपीएस आधारित नेव्हिगेशन, इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टीम, फ्लाइट टेस्टिंग, रिमोट पायलटिंग आणि स्ट्रक्चरल व्हॅलिडेशन ही सर्व कामे स्वतंत्रपणे पार पाडली.

९.२५ मीटर एवढा विशाल विंगस्पॅन आणि २६१ किलो वजन असलेले हे विमान भारतात तयार झालेले सर्वात मोठे आणि सर्वाधिक वजनाचे रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमान ठरले आहे. या विमानामध्ये १०० व्होल्ट क्षमतेची लि-पो २२० एएच बॅटरी वापरण्यात आली असून, विमानाची कमाल गती ताशी ८० किलोमीटर इतकी आहे. हे विमान एका वेळी १०० किलोपर्यंत पेलोड वाहून नेण्यास सक्षम असून, त्याची उड्डाण क्षमता १० मिनिटांची आहे. टेक-ऑफसाठी सुमारे २०० मीटर धावपट्टीची आवश्यकता भासते, तर विमान १०० मीटर उंचीपर्यंत सुरक्षितरीत्या उड्डाण करू शकते.

या प्रकल्पाच्या प्रवासात विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक आणि कार्यात्मक अडचणींचा सामना करावा लागला. गेल्या जवळपास चार वर्षांच्या कालावधीत प्रोपल्शन सिस्टीममधील अडथळे, स्ट्रक्चरल डिझाईनमधील बदल, फ्लाइट कंट्रोलर ट्युनिंग, प्रतिकूल हवामान, धावपट्टीच्या मर्यादा आणि अपयशी चाचण्या अशा अनेक आव्हानांवर त्यांनी मात केली. २०२४ मध्ये झालेल्या प्रारंभीच्या चाचण्या अपयशी ठरल्यानंतरही विद्यार्थ्यांनी हार न मानता फ्लाइट डेटा विश्लेषण, नव्याने डिझाईन, एरोडायनॅमिक्स व्हॅलिडेशन आणि सिस्टिमॅटिक टेस्टिंगच्या माध्यमातून विमानामध्ये सातत्याने सुधारणा केल्या. अखेर ४ मे २०२६ रोजी धुळे येथील धावपट्टीवर या विमानाने यशस्वी टेक-ऑफ, नियंत्रित उड्डाण आणि सुरक्षित लँडिंग करत भारतीय विद्यार्थी-नेतृत्वाखालील एरोस्पेस संशोधनात नवा इतिहास घडविला.

‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ च्या अधिकाऱ्यांकडून विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत ‘प्रोजेक्ट गरुडा’ ला विक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. त्यामुळे अनुभवाधारित शिक्षण, प्रगत एरोस्पेस संशोधन आणि विद्यार्थी-केंद्रित नवोन्मेष यांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे.

या प्रकल्पाला विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलगुरू डाँ. मंगेश कराड, Dr. यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कुलगुरू डॉ. राजेश एस., प्रोव्होस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे आणि डॉ. नचिकेत ठाकूर यांचे सहकार्य लाभले. अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुदर्शन सानप, एरोस्पेस विभागप्रमुख डॉ. कमलेश कुलकर्णी, डॉ. सुनील डिंगरे तसेच ‘क्रिया‘ चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष दराडे यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल बोलताना प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, “प्रोजेक्ट गरुडा हे अनुभवाधारित आणि नवोन्मेषप्रधान शिक्षणाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. विद्यार्थ्यांनी वर्गातील ज्ञानाचा वापर करून संशोधन, चिकाटी आणि संघभावनेच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवरील एरोस्पेस क्षेत्रातील मोठी कामगिरी साध्य केली आहे. अशा प्रकल्पांमधून भारताचे भावी एरोस्पेस तज्ज्ञ आणि संशोधक घडतील, अशी आम्हाला आशा आहे.”

या प्रकल्पाला पद्मश्री पुरस्कार विजेत्या स्कायडायव्हर शितल महाजन तसेच थ्रस्ट ऐअरक्राफ्ट प्रा. लि. चे संचालक कँप्टन अमोल यादव यांचेही मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले. भविष्यात ‘टीम स्कायट्रेक’ या प्रकल्पाच्या माध्यमातून ई-व्हीटॉल इलेक्ट्रिक एअर टॅक्सी, स्वॉर्म-ड्रोन सिस्टीमसाठी मदरशिप प्लॅटफॉर्म तसेच संरक्षण आणि नागरी वापरासाठी प्रगत यूएव्ही संशोधन व्यासपीठ विकसित करण्याच्या दिशेने काम करणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री अमोल रजपूत 8169324814 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??