क्राईम न्युज

पुणे-सोलापूर मार्गावरील लोणी स्टेशनजवळ विवाहितेचा विनयभंग; रिक्षातील प्रवाशा विरुद्ध गुन्हा दाखल..

पुणे (हवेली) : रिक्षातून प्रवास करताना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना कदमवाकवस्ती हद्दीतील लोणी स्टेशन जवळ घडली.

ही घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात मंगळवार (१जुलै) रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी काही तासात उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतुन जेरबंद करण्यात यश मिळवले.

याप्रकरणी २० वर्षिय पिडीत महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून समीर शहाजहान मुकेरी (वय ३४, रा.कोरेगाव मूळ तालुका हवेली जिल्हा पुणे) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला आपल्या मुलीला घेऊन त्यांच्या माहेरी चालल्या होत्या. हडपसर येथून रिक्षात बसल्या होत्या तेव्हा त्यांच्या उजव्या बाजूला मुली तर डाव्या बाजूला दोन अनोळखी पुरुष बसले होते. त्यातील एकजण समीर मुकेरी हा होता. रिक्षा कदमवाकवस्ती हद्दीतील लोणी स्टेशन येथे आली असता मुकेरी याने महिलेच्या मांडी व कमरेला स्पर्श केला. त्यामुळे तिच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. महिलेने तात्काळ रिक्षा चालकास रिक्षा थांबविण्यास सांगितली. तेव्हा मुकेरी तिच्या सोबत हुज्जत घालुन, तुला बघुन घेतो अशी धमकी देवुन त्या ठिकाणावरुन पळुन गेला. याप्रकरणी सदर महिलेने थेट लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुकेरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी समीर मुकेरी याला त्वरित अटक केली आहे.

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, पूजा माळी, रुपाली जाधव, पोलीस अंमलदार कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

मुख्य संपादक सुनिल थोरात 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??