क्राईम न्युज

महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा, तरुणाची आत्महत्या ; धनकवडी..

पुणे : धनकवडी भागात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.

सनी रमेश आठवले (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत कुंदन बाबुराव आठवले (वय ५२, रा. ओगलेवाडी, जि. सातारा) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी आठवले हा वर्षभरापासून एका महिलेसोबत राहत होता. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची माहिती त्याने नातेवाईक कुंदन आठवले यांना दिली होती. महिलेचे नातेवाईकही त्याला धमकी देत होते. बुधवारी मध्यरात्री सनी याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कुंदन यांना मिळाली. त्यांनी सनीच्या मित्रांकडे चौकशी केली. त्यानंतर ते पुण्यात आले. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. सनी याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप कुंदन यांनी केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार तपास करत आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??