जिल्हासामाजिक

पुणे सोलापूर महामार्गांवर कवडीपाठ येथे ट्रॅफिक पोलिसांची नियमावली बनली नागरिकांना रोजची डोकेदुखी, ; चक्क चार ते पाच किलोमीटर रोडवर दुतर्फा रांगा…

संबधित वाहतूक अधिकारी स्थानिक नागरिकांचा फोन उचलत नसल्याचा गंभीर आरोप...

पुणे (हवेली) :

पुणे सोलापूर महामार्गांवर कदमवाकवस्ती येथुन नॅशनल हायवे महामार्गावर वाहतूक कोंडीचा वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला.

 

लोणी काळभोर वाहतूक शाखेने कदमवाकवाकवस्ती टोल नाका या ठिकाणी जड वाहने थांबण्यासाठी गेली दोन महिने जड वाहनांना सायंकाळी ६:०० ते रात्री ११:०० वाजेपर्यंत शहरात जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला असल्याचे हजर असलेल्या वाहतूक कर्मचारी यांनी सांगितले. वरिष्ठांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.

वाहतूक शाखेची या कारवाईने पुणे सोलापूर महामार्गांवर नित्यनियमाने शहरात जाणाऱ्या व सोलापूर च्या दिशेने जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना वाहतुक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावाकऱ्यांना व प्रवासी नागरिकांना मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे

लोणी काळभोर वाहतूक शाखेला सक्षम अधिकार्याची गरज..

लोणी काळभोर पुणे सोलापूर महामार्गांवर (दि. १९) रोजी सायंकाळी जवळपास अंदाजे तीन ते चार किलोमीटर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली या वाहतूक कोंडीत रुग्णवाहीका अडकली यावेळी संबधित वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी यांना संपर्क साधला असता. सहाय्य्क पोलीस निरीक्षक देवेंद्र पवार यांनी फोन न उचलने हेच सोईस्कर पद्धतीने ठरवले. अशा वेळी जर जबाबदार पोलीस अधिकारी फोन उचलत नसतील तर लोणी काळभोर वाहतूक शाखेला एका जबाबदार सक्षम अधिकार्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिक बोलत होते.

तसेच संबंधित अधिकारी फोन उचलत नसल्याने संजय सुर्वे, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा संपर्क साधला असता खालील प्रमाणे प्रतिक्रिया दिली.

                 Api देवेंद्र पवार लोणी काळभोर वाहतूक शाखा.. 

या घटनेची माहिती घेण्यासाठी स्थानिक पत्रकार फोन करत असताना संबंधित पोलीस अधिकारी देवेंद्र पवार लोणी काळभोर वाहतूक शाखा यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.

         संजय सुर्वे, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.. 

तेथील पोलीस अधिकारी यांचे बोलणे झाले आहे. शहरात दिवसा जड वाहनास बंदी आहे. ते कायदेशीर आहे. पोलीस कमिशनर यांची हद्द असल्याने जड वाहनास रात्री १० वाजेपर्यंत शहरात बंदी आहे. पर्यायी मार्ग असताना वाहने सरळ येतात कारण पर्यायी मार्गावर जड वाहने वळत नाहीत असे निदर्शनास आले आहे. तरीही दुसरा पर्यायी मार्ग काढण्याचे संबंधित अधिकारी यांना सुचना देण्यात येतील. दिवसा संबंधित अधिकारी सर्वे करतील त्यानुसार मार्ग काढण्यात येईल. अशी प्रतिक्रिया दिली.

सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासामुळे स्थानिक नागरिक संबंधित वाहतूक शाखेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहे व या वरील प्रतिक्रियेवर अधिकारी कुठला पर्यायी मार्ग काढणार आहे. कशा प्रकारे या झालेल्या घटनेवर कारवाई करणार आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??