शिक्षण

परीक्षेच्या प्रशासकीय कामकाजासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित ; प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर…

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात परीक्षा विषयक कामांची देयके ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठीची प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन...

पुणे (हवेली) : महाविद्यालय स्थरावरील परीक्षेसंबंधी देयके सादर करत असताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या संदर्भात महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची मते विचारात घेऊन ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

प्रशासकीय कामात वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच अचूकता व पारदर्शकता आणण्यासाठी पेपरलेस प्रशासकीय कामकाज करण्यावर विद्यापीठाचा भर असणार आहे. असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वित्त व लेखा विभाग आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने परीक्षा विषयक कामांची देयके ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठीची प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव प्रशासन ए. एम. जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. देविदास यायदंडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. धोंडीराम पवार, परीक्षा संचालक डॉ. प्रभाकर देसाई, वित्त व लेखा अधिकारी वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके, प्राचार्य रितेश पाटील उपस्थीत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव प्रशासन ए. एम. जाधव यांनी परीक्षा विषयक कामांच्या देयकांसाठी ऑनलाईन प्रणाली ही महाविद्यालयांसाठी उपयुक्त असून त्यामुळे यामुळे प्रशासकीय दिरंगाई होणार नाही.

परीक्षा संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी परीक्षा सुरळीतपणे व्हाव्यात, मुल्यमापनाचे कामकाज वेळेत व्हावे यासाठी लवकरच प्राचार्य आणि महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी यांची विद्यापीठ कार्यशाळा आयोजित करणार असल्याचे सांगितले.

या कार्यशाळेत पुणे शहर व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील ५५० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

या प्रसंगी सहाय्यक रजिस्ट्रार मयूर चोरडिया, २विभाग अधिकारी स्वाती थिटे, वरिष्ठ सहाय्यक किशोर दूधभाते, टीम लीडर तेजस्विनी कोळी, प्राजक्ता अष्टावधानी, ओंकार पाटील आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, डॉ. अण्णासाहेब निंबाळकर, डॉ. अजय कवाडे, गणेश साबळे यांनी या कार्यशाळेचे संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अजय कवाडे यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??