क्राईम न्युज

72 तासांत गुन्हा उघड ; 68 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत…

रांजणगाव एमआयडीसीतील चमाडीया गोडाऊन चोरी प्रकरण उघडकीस...

रांजणगाव (ता. शिरूर, जि. पुणे) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील चमाडीया गोडाऊनमधून आयटीसी कंपनीचे सिगारेट, बिस्किटे, साबण व इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणावर चोरी करणाऱ्या टोळीचा रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या 72 तासांत छडा लावला आहे. या कारवाईत चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 68 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी अटकेत असून अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

रांजणगाव एमआयडीसी येथील चमाडीया गोडाऊनमध्ये आयटीसी कंपनीचा माल साठवला जातो. येथून ट्रान्सपोर्टद्वारे डिलरकडे माल पाठवण्यात येतो. मुव्हिंग लॉजिस्टिक प्रा. लि. कंपनीची चार इलेक्ट्रिक पिकअप वाहने असून त्यामध्ये रात्रीच्या वेळेस चलनासह माल भरून ठेवला जातो. याचाच फायदा घेत दि. 17 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 6.40 वाजता अज्ञात चोरट्यांनी माल भरलेली इलेक्ट्रिक पिकअप सुरू करून गेटवर चलनाची नोंद करत तब्बल 65,98,897 रुपये किमतीचा माल चोरून नेला होता.

या प्रकरणी दिपक देवदास शिंदे (रा. लोणीकंद, मगरवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा र. नं. 478/2025 भा.न्या.संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. औद्योगिक क्षेत्रातील ही मोठी चोरी देशाच्या आर्थिक प्रगतीस धोकादायक असल्याने पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल (पुणे ग्रामीण) यांनी या गुन्ह्याकडे विशेष लक्ष देत स्वतंत्र तपास पथके नेमण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान चोरी केलेली पिकअप ही गोडाऊनपासून काही अंतरावर सोडून देण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून त्यातून 54,53,000 रुपये किमतीची सिगारेट चोरट्यांनी दुसऱ्या वाहनाद्वारे नेल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी परिसरातील 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले.

दरम्यान, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ हे वाघोली परिसरात संशयित वाहनाचा शोध घेत असताना सदर वाहन कावेरी हॉटेल, वाघोली येथे डिलिव्हरी करताना आढळून आले. वाहनाचा मालक, सुपरवायझर व चालक यांची चौकशी केली असता सुपरवायझर प्रथमेश चव्हाण याने आरोपी दिपक ज्ञानेश्वर ढेंरंगेअल्ताफ आयुब मुल्ला यांना चोरीसाठी वाहन दिल्याची कबुली दिली. त्यावरून प्रथमेश ज्ञानेश्वर चव्हाण (रा. वाघोली, ता. हवेली) यास अटक करण्यात आली. तपासात चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 68 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

यातील आरोपी दिपक ज्ञानेश्वर ढेंरंगे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शिक्रापूर, सिंहगड रोड व लोणीकंद पोलीस ठाण्यात चोरीचे एकूण 8 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस अभिलेखातून मिळाली आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोसई अविनाश थोरात, दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, माणिक काळकुटे, अमोल रासकर यांनी पार पाडली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोसई अविनाश थोरात करीत आहेत.

Editer Sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??