क्राईम न्युज

परित्यक्ता महिलेवर लॉजवर बलात्कार; शादी डॉट कॉमवरून झाली ओळख…

तुळशीराम घुसाळकर

पुणे (ता‌.हवेली) : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील एका लॉजवर परित्यक्ता महिलेवर जबरदस्तीने बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती वादांमुळे पतीपासून वेगळी राहणाऱ्या महिलेची शादी डॉट कॉम या साईटवर आरोपीशी ओळख झाली होती. विश्वास संपादन करून एकांतात भेटायला बोलावून त्याने बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चंद्रकांत दिनकर थोरात (वय ३०, रा. चाकण, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिला विवाहित असून दोन मुलींसोबत राहते. पतीपासून वेगळी राहिल्यानंतर घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करण्याचा तिचा विचार होता. त्यामुळे ती शादी डॉट कॉम या साईटवर जोडीदार शोधत होती. याद्वारे तिची आरोपी चंद्रकांत दिनकर थोरात याच्याशी ओळख झाली.

२४ ऑगस्ट रोजी दुपारी आरोपीने बोलण्याचा बहाणा करून उरुळी कांचन येथे पिडीतेला भेटायला बोलावले. त्यानंतर दुचाकीवर बसवून तिला कुंजीरवाडीतील लॉजवर नेले. तेथे जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. पुढे वारंवार फोन करून तो पिडीतेस धमक्या देत शारिरीक सुखाची मागणी करत होता.

शेवटी कंटाळून पिडीतेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के पुढील तपास करीत आहेत.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??