जिल्हामहाराष्ट्रराजकीयशिक्षणसामाजिक

कचरा प्रश्न चिघळला ; एमआयटीवर अतिक्रमणाचे आरोप, ग्रामस्थ आक्रमक – प्रशांत काळभोर यांचा कडक इशारा…

लोणी काळभोर गाव आधीपासून संस्था नंतरची... प्रशांत काळभोर

लोणी-काळभोर (ता. हवेली) : मुळा-मुठा नदीपात्रात कचरा टाकण्याच्या प्रश्नावरून सुरू असलेला वाद आता अधिकच तीव्र झाला असून लोणी-काळभोर ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि एमआयटी प्रशासन यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे गावांमध्ये कचरा साचून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न प्रलंबित असताना अचानक विद्यार्थ्यांनी ‘कचरा बंद’ आंदोलन छेडत कचरा वाहतुकीला अडथळा निर्माण केला. परिणामी, लोणी-काळभोर व परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामस्थांच्या मते, हा प्रश्न सोडवण्याऐवजी आंदोलनामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी एमआयटी प्रशासनावर गंभीर आरोप करत आंदोलनामागे संस्थेचा हात असल्याचा दावा केला. “एमआयटी प्रशासनाने विद्यार्थ्यांना पुढे करून आंदोलन उभे केले आहे. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून ग्रामस्थांनी संयम राखला आहे,” असे ते म्हणाले. तसेच, “एमआयटी संस्थेकडे स्वतःचा कचरा प्रकल्प नाही. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरद्वारे कचरा थेट नदीपात्रात टाकला जातो,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

अतिक्रमणाच्या मुद्द्यावर बोलताना प्रशांत काळभोर यांनी सांगितले की, “एमआयटीने ओढ्यावर अतिक्रमण करत थेऊर-लोणी काळभोर मार्गावरील रस्त्याचे क्षेत्र हडप केले आहे. नकाशात रस्ता दाखवला असला तरी प्रत्यक्षात तो अस्तित्वात नाही. गट क्रमांक ३९ व ११३ मधील रस्त्यांवर अतिक्रमण करून नागरिकांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. ”ग्रामस्थांनीही याबाबत तीव्र भूमिका घेत गावाचा नदीपात्राकडे जाणारा पारंपरिक रस्ता गायब झाल्याचा आरोप केला. “गाव आधीपासून आहे, संस्था नंतर आली. त्यामुळे गावाच्या हक्काच्या रस्त्यावर अडथळे निर्माण करणे अन्यायकारक आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली.

याच पार्श्वभूमीवर लोणी-काळभोर ग्रामपंचायतीने गट क्रमांक ११३ ही जागा कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. त्या ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण व विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा ग्रामपंचायतीचा मानस असून यामुळे दीर्घकालीन तोडगा निघू शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे.

प्रशासनाकडे करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये गट क्रमांक ११३ ची तातडीने मोजणी करून ती जागा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करणे, गट क्रमांक ३९ मधील रस्ता तात्काळ खुला करणे आणि पर्यायी रस्त्याची व्यवस्था करणे यांचा समावेश आहे. या संदर्भात प्रांत अधिकारी माने यांनी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांची प्रतिक्रिया…

“कचऱ्यामुळे गावात राहणे कठीण झाले आहे. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.” “आंदोलनामुळे कचरा उचलणे बंद झाले, पण पर्यायी व्यवस्था नाही. याचा त्रास आम्हालाच सहन करावा लागतो.” “रस्ते अडवून आणि अतिक्रमण करून गावकऱ्यांचे हक्क हिरावले जात आहेत. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा.” दरम्यान, एमआयटीने ज्या-ज्या ठिकाणी अतिक्रमण केले आहे ते तात्काळ हटवावे, अन्यथा ग्रामस्थ सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.

आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा कडक इशारा प्रशांत काळभोर यांच्या सह ग्रामस्थांनी दिला.

एकूणच, कचरा प्रश्नासोबतच अतिक्रमणाचा मुद्दा चिघळल्याने लोणी-काळभोर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज समाजातून व्यक्त होत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री अमोल रजपूत 8169324814 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??