जिल्हासामाजिक

सरकारी, खाजगी नोकरदार यांनी रिक्षा परवाने जमा करावीत ; अन्यथा आरटीओ करणार सक्त कारवाई..

नोकरदारांनो रिक्षा परवाने जमा करा! काय आहे 'आरटीओ';चा नियम पहा?

पुणे : सरकारी किंवा खासगी कार्यालयात नोकरी करून रिक्षाही चालवणाऱ्या चालकांचे परवाने पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) रद्द करण्यात येणार आहेत. ‘अशा नोकरदारांनी ३१ जानेवारीपर्यंत स्वेच्छेने परवाने जमा करावेत.

त्यानंतरही रिक्षा चालवत असल्याचे निदर्शनास आल्यास नोकरदार रिक्षाचालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा आरटीओने दिला आहे.

‘आरटीओ’च्या निर्णयानुसार खुल्या रिक्षा परवाना धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, परवानाधारक सरकारी, निमसरकारी, खासगी उद्योगसंस्थेत किंवा असंघटित क्षेत्रातील संस्थेत नोकरदार म्हणून कार्यरत नसावा, अशी अट आहे. परवाने देताना रिक्षाचालकांकडून तसे प्रतिज्ञापत्रदेखील घेण्यात आले आहे. त्यानुसार आत्तापर्यंत ‘आरटीओ’कडून शहरात एक लाख १९ हजार ९७२ रिक्षा परवाने देण्यात आले आहेत.

मात्र, यापैकी अनेक रिक्षाचालक नोकरी करतात, तर काही परवाना घेऊन त्रयस्थ व्यक्तीला भाडेतत्त्वावर रिक्षा चालविण्यासाठी देऊन व्यवसाय करतात. परिणामी, केवळ रिक्षा व्यवसायावर अवलंबून असलेल्यांचे नुकसान होते, अशी माहिती पुणे ‘आरटीओ’चे अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली.

‘नोकरी करणाऱ्या रिक्षा चालकांनी ३१ जानेवारीपर्यंत आपले परवाने पुण्याच्या आरटीओ कार्यालयात जमा करावेत. मुदतीनंतरही असे चालक असल्याची तक्रार प्राप्त झाली किंवा आढळून आल्यास संबंधितांना दहा हजार रुपयांचा दंड करण्यात येईल,’ असे भोसले यांनी स्पष्ट केले.’आरटीओ’च्या निर्णयाचे स्वागत आहे. केवळ रिक्षावर उपजीविका असणाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विजय रवळे यांनी व्यक्त केली.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??