जिल्हाराजकीयसामाजिक

साईनाथ कॉलनीमध्ये ३० लाखांच्या ड्रेनेज लाईनचे भूमिपूजन संपन्न… राहुल शेवाळे…

मांजरी बु!! (हडपसर) : मांजरी गावातील साईनाथ कॉलनीमध्ये तब्बल ३० लाख रुपये खर्चाच्या नवीन ड्रेनेज लाईन कामाचे भूमिपूजन पुणे जिल्हा BJP चे उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या हस्ते पार पडले. पुणे महापालिकेच्या वतीने हा निधी मंजूर करण्यात आला असून, यासाठीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा स्वतः माननीय राहुल शेवाळे यांनी केला होता.

साईनाथ कॉलनीमध्ये पूर्वीची ड्रेनेज लाईन सुमारे २० वर्षांपूर्वी करण्यात आली होती. कालांतराने ही लाईन पूर्णपणे गाळाने भरल्याने पाणी तुंबण्याची समस्या तीव्र झाली होती. नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींनंतर मनपाच्या ड्रेनेज विभागाने तात्काळ पाहणी केली आणि परिसरात नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचा निर्णय घेतला.

या कामाचे भूमिपूजन वाढत्या पायाभूत सुविधांच्या गरजेला प्रतिसाद देणारे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. कार्यक्रमास राहुल शेवाळे यांच्यासह आबासाहेब भगत, बाळासाहेब मोरे, प्रमोद कोदरे, बबन जगताप यांच्या उपस्थितीत विधी पार पडला. तसेच पांडुरंग जाधव, दादा भंडारी, बाळासाहेब शिंदे, मंगेश भंडलकर, अविनाश नारायण भंडारी, रतन भंडारी, शामराव शेटे, बापू होले, संतोष शिंदे, बाळासाहेब घुले, दिवेकर, ढवळे यांसह मोठ्या संख्येने महिला व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

नवीन ड्रेनेज लाईनमुळे साईनाथ कॉलनीतील पाणी तुंबण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??