क्राईम न्युज

लोणीकंद, वाघोली व लोणीकाळभोर हद्दीतील अवैध दारू व जुगार अड्डे उध्वस्त; गुन्हे शाखा युनिट–६ ची धडक कारवाई…

पुणे : आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून, त्यानुसार गुन्हे शाखेकडील विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. याच अनुषंगाने मागील आठवड्यात गुन्हे शाखा युनिट–६ च्या पथकाने लोणीकंद, वाघोलीलोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील विविध परिसरात अवैध दारू अड्डे व जुगार अड्ड्यांवर एकामागोमाग एक छापे टाकून प्रभावी कारवाई केली आहे.

या कारवाईत अवैध दारू अड्डे उध्वस्त करताना वाघोली येथील आव्हाळवाडी रोड परिसरातून सुरेखा दिनेश नानवत (वय ३०) हिच्या ताब्यातून ६५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली असून त्याची अंदाजे किंमत ६,५०० रुपये आहे. तसेच केसनंद येथील जाधव वस्ती परिसरातून वेंकटप्पा बिचप्पा गौड (वय ५१) याच्या ताब्यातून १०० लिटर तयार ताडी जप्त करण्यात आली असून त्याची किंमत सुमारे ७,५०० रुपये आहे. पिंपरी सांडस येथील मुकुंद रघुनाथ निकाळजे (वय ५०) याच्या ताब्यातून ४,७४० रुपये किमतीची देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे जुगार अड्ड्यांवरही कारवाई करताना शिरसवाडी येथील बालाजी निसर्ग सोसायटी परिसरात सुरू असलेला जुगार अड्डा उध्वस्त करण्यात आला. याठिकाणी सुनील रामधन राठोड (रायटर), संजय विलास चांदणे (खेळी) आणि दगडू शिवराम वाघमारे (मालक) हे जुगार खेळत असताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण १२,०५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याशिवाय लोणीकाळभोर हद्दीत करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत बसवराज इरप्पा रामपुरे, निलेश सुरेश फुलपगर, सचिन बाबुराव काळभोर (मालक), रमेश वसंत बामणे आणि गणेश नारायण सोनवणे हे जुगार खेळत असताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून एकूण १२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही सर्व कारवाई पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे–२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण व गुन्हे शाखा युनिट–६ च्या पथकाने यशस्वीपणे केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशाच प्रकारची कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??