जिल्हाशिक्षणसामाजिक

“बाल वैज्ञानिकांची उंच भरारी” – ५३ व्या पुणे शहर पूर्व विभाग तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

हडपसर (पुणे) : दिनांक २२/१२/२०२५ रोजी ५३ वे पुणे शहर पूर्व विभाग तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन वानवडी, पुणे येथील गिरमे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञानातील आपली कल्पकता, प्रयोगशीलता आणि संशोधन वृत्ती सादर करत लक्षणीय सहभाग नोंदवला.

या बाल वैज्ञानिक प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, नवकल्पनांना वाव देणे आणि अध्ययन अधिक रंजक बनवणे हा उद्देश ठेवण्यात आला होता. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध विज्ञान प्रकल्प, मॉडेल्स व प्रयोग पाहण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती.

या उपक्रमांतर्गत प्रश्नमंजुषा, निबंध लेखन, वकृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः प्रश्नमंजुषा स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल, हडपसर येथील इयत्ता आठवीतील कु. तोडमल राधिका सोमनाथ आणि कु. सुतार अनुष्का आनंदराव या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या तसेच विद्यार्थ्यांच्या यशस्वी सहभागासाठी गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका झीनत सय्यद , उपमुख्याध्यापिका निलीमा जगताप, विज्ञान शिक्षिका जयश्री पलंगे आणि इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रयत्नांमुळे बाल वैज्ञानिक प्रदर्शन हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरले.

या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची गोडी अधिक वाढून भविष्यातील संशोधक घडण्यास निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??