जिल्हाशिक्षणसामाजिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘रयत अविष्कार संशोधन प्रकल्प महोत्सव २०२५’ चे भव्य आयोजन…

हडपसर (पुणे) : दि. २२ डिसेंबर रयत शिक्षण संस्था, सातारा आणि एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रयत अविष्कार संशोधन प्रकल्प महोत्सव २०२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ बुधवार, दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता महाविद्यालयालगत असलेल्या विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह, माळवाडी, हडपसर येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

या संशोधन महोत्सवाचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा येथील कुलगुरू प्रा. डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे चेअरमन तथा आमदार चेतन तुपे – पाटील उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी (भा.प्र.से. निवृत्त) हे असतील. तसेच कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख (भा.प्र.से. निवृत्त), सहसचिव (उच्च शिक्षण) प्रा. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दिलीप तुपेअमर हरिदास तुपे यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.

रयत अविष्कार संशोधन प्रकल्प महोत्सव २०२५’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देणे, नवोन्मेषी आणि सर्जनशील कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन संस्कृती अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या महोत्सवात विविध विद्याशाखांतील विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प, समाजोपयोगी उपक्रम तसेच तंत्रज्ञानाधारित नावीन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

या महोत्सवाचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. विजय कुंभार आणि प्रो. डॉ. रंजना जाधव कार्यरत असून, संपूर्ण आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. संशोधन, नवकल्पना आणि शैक्षणिक प्रगतीला चालना देणाऱ्या या महोत्सवाला शिक्षक, संशोधक, विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??