जिल्हासामाजिक

मांजरीत जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टचा ‘आधार मेळावा’; दिव्यांग सक्षमीकरणाचा ठोस कृतीशील संदेश…ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय नन्नावरे…

मांजरी (हडपसर) : (दि.२१) समाजातील दिव्यांग घटकांना केवळ सहानुभूती नव्हे, तर स्वावलंबनाची ठोस दिशा देणारा जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टचा ‘दिव्यांग आधार मेळावा’ मांजरी येथील दिव्यांग कल्याण केंद्रात उत्साहात पार पडला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

प्रास्ताविकात ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय नन्नावरे यांनी संस्थेमार्फत दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणाच्या सातत्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला. दरवर्षी ३ डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिन साजरा होतो; मात्र याच दिवशी मांजरी येथील ग्रामदैवत मांजराई देवीची यात्रा असल्याने दिव्यांगांना प्रत्यक्ष लाभ देता यावा, या उद्देशाने हा स्वतंत्र मेळावा आयोजित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या मेळाव्यास शेवाळवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राहुल शेवाळे, मांजरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवराज घुले, माजी उपसरपंच सुमित घुले, भाजपा महिला आघाडीच्या श्लेशा सुमित घुले, शासन नियुक्त नगरसेवक बाळासाहेब घुले, माजी सदस्या आशाताई आदमाने, ॲड. कृपाल पलुसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गजेंद्र मोरे, शैलेंद्र बेल्हेकर, गौरव जाधव, राजेश आरणे, भाजपाचे विद्याधर भोसले, आईसाहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण भोसले, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र घुले, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नाना भापकर, पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेचे संचालक अनिल अबनवे, पोलीस पाटील अमोल भोसले, पितांबर धिवार, मनसेचे कुलदीप यादव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्यात दिव्यांगांसाठी रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगार आणि स्वावलंबन यावर मार्गदर्शन करण्यात आले. गरजू दिव्यांगांना राहुल शेवाळे यांच्या सौजन्याने मोफत तीनचाकी सायकल, व्हीलचेअर, कुबड्या, वॉकर आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच के. टी. पलुसकर पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने उपस्थित दिव्यांगांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

उपस्थित मान्यवरांनी जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत, दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ट्रस्टने उचललेली पावले प्रेरणादायी व अनुकरणीय असल्याचे मत व्यक्त केले. माजी उपसरपंच सुमित घुले यांच्या सौजन्याने दिव्यांगांसाठी आयोजित स्नेहभोजनाने या उपक्रमाची सामाजिक बांधिलकी अधिक ठळक झाली.

हा मेळावा दिव्यांगांच्या जीवनात आत्मविश्वास, स्वावलंबन आणि आशेचा नवा प्रकाश निर्माण करणारा ठरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी पृथ्वीराज मस्के, शशिकांत राऊत, आबासाहेब भैरवकर, ओंकार अंकुशे, अभय पाटील, संजय देवरे, अविनाश कुऱ्हाडे, संतोष तोरणे, अनिकेत लवळे, छाया सिताफ, पूजा जगताप, वैशाली ताटे आदींनी परिश्रम घेतले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??