क्राईम न्युज

किरकोळ कारणावरून इनामदार वस्तीत दोन गटांत हाणामारी; दोघे गंभीर जखमी, ११ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल…

तुळशीराम घुसाळकर

लोणी काळभोर (ता. हवेली) : लोणी काळभोर येथील इनामदार वस्ती परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना बुधवारी (दि. ३१ डिसेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले असून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकूण ११ जणांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा व मोटारसायकलच्या किरकोळ धडकेवरून वादाला सुरुवात झाली. हा वाद पाहता पाहता शिवीगाळ, धमकी आणि लोखंडी हत्यार व लाकडी दांडक्याने मारहाणीपर्यंत वाढला.

या प्रकरणी शहीदा मुबारक इनामदार (वय ५०, रा. इनामदार वस्ती, बाजारमळा रोड, लोणी काळभोर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मनसुर गनी इनामदार (४५), रिहान मन्सुर इनामदार (२३), जैद मन्सुर इनामदार (२५), निहाल खालीद इनामदार (२०) व खालीद गनी इनामदार (४५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शहीदा इनामदार यांचा भाचा शाहरुख नजीर शेख याच्या रिक्षाचा धक्का मनसुर इनामदार यांच्या मोटारसायकलीस लागल्याने वाद निर्माण झाला. यानंतर आरोपींनी शाहरुख शेख, परवेझ इनामदार तसेच शहीदा इनामदार यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच शहीदा इनामदार यांचे दिर हरुन इब्राहिम इनामदार यांना निहाल इनामदार याने लोखंडी हत्याराने कपाळावर व पाठीवर मारहाण करून जखमी केले.

दरम्यान, याच घटनेतून दुसऱ्या गटाकडूनही प्रतितक्रार दाखल करण्यात आली आहे. मनसुर गनी इनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हरुन इब्राहिम इनामदार (५०), रेश्मा हरुन इनामदार (४५), परवेझ हरुन इनामदार (२२), शायरान (५५), शाहरुख नजीर शेख (३०) व करीन इनामदार (२६) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसुर इनामदार हे त्यांची ओला कंपनीची मोटारसायकल पार्किंगमधून बाहेर काढत असताना शाहरुख शेख याने रिक्षाने धडक दिली व शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर मनसुर इनामदार, त्यांची पत्नी आशिया तसेच मुले रिहाननिहाल यांना जीवे मारण्याची धमकी देत दगड व लोखंडी हत्याराने मारहाण करण्यात आली. या हाणामारीत निहाल इनामदारहरुन इब्राहिम इनामदार हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकूण ११ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळीप्रल्हाद जगताप करत आहेत.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??