जिल्हाराजकीयसामाजिक

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शिंदे गटाकडून विनम्र अभिवादन…

पुणे : हिंदुहृदयसम्राट, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने सदाशिव पेठेतील नागनाथ पार येथे भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

हा अभिवादन कार्यक्रम शिवसेनेचे पुणे शहर व जिल्हा शिक्षक-शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष अनिल गडकरी सर तसेच कसबा विभाग प्रमुख निलेश जगताप यांच्या हस्ते पार पडला. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि सामान्य जनतेच्या हक्कासाठी केलेल्या लढ्याची उपस्थित शिवसैनिकांनी आठवण करून दिली.

या प्रसंगी उपस्थित शिवसैनिकांना लाडू व मिठाई वाटप करण्यात आले. कार्यक्रमात ज्येष्ठ शिवसैनिक राजाभाऊ भिलारे, सुधीर कुरुमकर, संघटक प्रकाश ढमढेरे, वडगाव शेरी प्रमुख शंकर संगम, आशुतोष शेडगे, प्रमोद प्रभुणे, निरंजन खवळे, महेंद्र जोशी, नवनाथ निवंगुणे, मीनल धनवडे, अकबर शेख, संदीप शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांनी दिलेले नेतृत्व आजही शिवसैनिकांसाठी प्रेरणास्थान असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??