जिल्हा

ग्राम सुरक्षा दल मेळावा, ग्रामसुरक्षा दलातील सदस्य यांना ड्रेस लाठी शिट्टी या साहित्याचे वाटप ; वालचंदनगर…

डॉ गजानन टिंगरे

पुणे (इंदापुर) : ग्रामसुरक्षा दलाचे कार्य पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे वालचंदनगर पोलीस स्टेशन यांचे वतीने आज शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य ग्राम सुरक्षा दल मेळावा आयोजित केला होता.

वालचंद नगर पोलीस स्टेशन अंतर्गत ३९ गावे १३ वाड्या वस्त्या असे एकूण ५२ गावांमधील ग्रामसुरक्षा दल सदस्य २३३ जवानांची गाव पातळीवर निवड करून त्यांना गणेश बिरादार अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग तसेच डॉक्टर सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग यांचे हस्ते ग्रामसुरक्षा दलातील सदस्य यांना ड्रेस लाठी शिट्टी या साहित्याचे वाटप करण्यात आले.

तसेच ३९ गावांमधील पोलीस पाटील या पैकी काही पोलीस पाटलांनी विशेष कामगिरी केलेली आहे त्यांना वालचंद नगर पोलीस स्टेशन कडून सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला पोलीस पाटील मारुती दत्तू रासकर राहणार निर्वांगी विलास परब कणसे मानकरवाडी राजू गायकवाड चिखली सागर खरात तावशी उषा वाघमोडे शेळगाव पिनाली गायकवाड कर्दनवाडी रेश्मा प्रशांत नवसे जाचकवस्ती तसेच संदीप चिंचकर रणगांव पोलीस पाटील कळंब गावचे पोलीस पाटील करडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रत्येक गावांमधील महिला दक्षता कमिटी स्थापन केल्याने काही महिलांच्या सामाजिक अडीअडचणी सोडवण्यासाठी विशेष कामगिरी केली आहे त्या महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे. अश्विनी गणेश जाधव अध्यक्ष राणी अमोल थोरात, मयुरी शरद जामदार बेलवाडी, सोनाली महेश निंबाळकर गीतांजली पाटोळे, योगिता जामदार जाचक वस्ती यांचाही सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी रतिलाल चौधर पोलीस उपनिरीक्षक यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर ॲडव्होकेट सुप्रिया बर्गे यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर डॉक्टर सुदर्शन राठोड म्हणाले की ग्राम सुरक्षा दलाचे कार्य पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे सामाजिक बांधिलकीची भावना ठेवून अधिक अधिक युवकांनी ग्रामसुरक्षा दलात सहभागी व्हावे पोलिसांचे संख्या बळ विचारात घेता पोलीस सर्वच ठिकाणी जाऊ शकतील असे नाही त्यामुळे मदतीसाठी ग्रामसुरक्षा दलातील जवान असणे गरजेचे बनले आहे ग्रामसुरक्षा दलातील जवानांनी चांगले काम केले तर पोलीस स्टेशन कडून सन्मान होत असतो त्याचा फायदा पोलीस भरतीसाठी होत असतो आपल्याला एक शिस्त वेगळीच लागते त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार म्हणाले की ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना प्रशिक्षण द्या म्हणजे कसे बोलावे कसे राहावे ड्रेस ला ठी शिट्टी चा वापर चांगल्या कामासाठी करा रात्रगस्त पालखी सोहळा गणपती बंदोबस्त गावची जत्रा या ठिकाणी आपण पोलिसांना मदत करावी गावामध्ये बाहेरून येणारी वाहने संशयित व्यक्ती यांची विचारपूस केली पाहिजे काही संशयत दिसल्यास पोलिसांना तात्काळ फोन करून माहिती सांगितली पाहिजे आपण रात्रगस्त सतर्कपणे करत जावा आपण सतर्क ड्युटी केली तर चोरांचे प्रमाण गरफोडीचे प्रमाण होणार नाही.

तसेच ज्या ग्रामसुरक्षा दलातील जवान यांनी विशेष कामगिरी केली की त्यांचा सन्मान पोलीस स्टेशन येथे केला जाईल तसेच ग्राम सुरक्षा दलामध्ये कर्तव्य बजावत असताना जे युवक यांना पोलीस भरती सैनिक भरती व इतर शासकीय नोकरीसाठी फायदा होईल असेही सांगितले. यावेळी प्रस्ताविक रतिलाल चौधर पोलीस उपनिरीक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शन राजकुमार डुणगे सहाय्यक पोलीस निरीक्षक वालचंद नगर पोलीस स्टेशन यांनी मांडले यावेळी मिलिंद मिठ्ठा पल्ली पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर पोलीस स्टाफ ग्रामसुरक्षा दलातील सदस्य महिला दक्षता समिती पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होता.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??