क्राईम न्युजजिल्हामहाराष्ट्रसामाजिक

कवडीपाट टोलनाका परिसर खळबळ, हॉटेल जयश्री येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांची धडक कारवाई…पाहा व्हिडिओ

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : पुणे–सोलापूर महामार्गालगत कवडीपाट टोलनाका परिसरात असलेल्या हॉटेल जयश्री रेस्टोबार अँड लॉजिंग येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईमुळे कदमवाकवस्ती, लोणी काळभोर व परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना गुप्त खबर्‍यामार्फत हॉटेल जयश्रीमध्ये बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची ठोस माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचत बोगस ग्राहक पाठवला. खात्री होताच पोलिसांनी अचानक छापा टाकत संपूर्ण सेक्स रॅकेट उघडकीस आणले.

पुणे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या या नामांकित हॉटेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू असल्याची चर्चा परिसरात होती. मात्र आता पोलिसांच्या कारवाईने या बेकायदेशीर धंद्याचा पुरता भांडाफोड झाला आहे. या प्रकरणात हॉटेल मॅनेजर, मालक तसेच रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे काम चालू आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महामार्गालगत सुरू असलेल्या अशा अनैतिक आणि गुन्हेगारी धंद्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत होते. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या धाडसी व ठाम भूमिकेमुळे हा अड्डा उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या प्रकरणात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत कारवाई करण्यात येत असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या कारवाईमुळे लोणी काळभोर पोलिसांची गुन्हेगारीविरोधातील कडक भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, परिसरातील अवैध धंदे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

या प्रकरणाची सविस्तर माहिती काही तासांत अधिकृतरित्या जाहीर होण्याची शक्यता आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??