सामाजिक

“कायदा व्यवसाय: एक श्रेष्ठ आणि प्रतिष्ठित क्षेत्र” ; एमआयटी-एडीटी विद्यापीठात कार्यशाळा संपन्न

पुणे (हवेली) : लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिजाईन, टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे आणि आंतरराष्ट्रीय कौन्सिल ऑफ ज्युरिस्ट्स (लंडन) यांच्या संयुक्त विद्यमाने “व्यावसायिक नैतिकता आणि मानवी मूल्ये” या विषयावर कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या कार्यशाळेचा उद्देश कायदा व्यवसायातील नैतिकतेचे महत्त्व अधोरेखित करणे आणि विद्यार्थ्यांना न्याय व मूल्यांसाठी प्रेरित करणे होता. कार्यक्रमाची सुरुवात एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

त्यांच्यासोबत कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू प्रा. डॉ. रामचंद्र पुजेरी विद्यापीठातील अधिष्ठाता आणि संचालक उपस्थित होते. प्रा. डॉ. कराड यांनी कायदा व्यवसायाचे महत्त्व सांगताना म्हटले की, “कायदा व्यवसाय हा केवळ एक करिअर नसून, तो न्याय व सत्यासाठी लढणारे श्रेष्ठ क्षेत्र आहे, जे व्यक्तीला समाजात मान व प्रतिष्ठा देते.”

कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आदिश अग्रवाल, अध्यक्ष, इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ ज्युरिस्ट्स (लंडन), यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले की, “कायदा व्यवसाय समाज घडविण्याचे व न्यायासाठी लढण्याचे शक्तिशाली साधन आहे. हा व्यवसाय नैतिकता व समर्पणाची मागणी करतो आणि व्यक्तीला समाजात नेतृत्व करण्यासाठी प्रेरित करतो.”

कार्यक्रमानंतर डॉ. आदिश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधला. त्यांनी त्यांच्या अनुभवांचे शेअरिंग करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. ही कार्यशाळा डॉ. सपना सुकृत देव, अधिष्ठाता, स्कूल ऑफ लॉ, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.आदित्य केदारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??