जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

रांजणगाव परिसरात गुंगीकारक ‘बंटा’ गोळ्यांचा साठा जप्त ; २०३ किलो अंमली पदार्थासह तरुण आरोपी ताब्यात…

तुळशीराम घुसाळकर

रांजणगाव (हवेली पुणे) : केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून अवैध अंमली पदार्थ व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या कारवाईत रांजणगाव एमआयडीसी परिसरात २०३ किलो ६०० ग्रॅम वजनाच्या अंमली पदार्थ मिश्रित गुंगीकारक ‘बंटा’ गोळ्या जप्त करण्यात आल्या असून, या प्रकरणी एका तरुण आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत एकूण ५७ हजार ३५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थ व तंबाखुजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री व साठवणूक रोखण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत ही मोठी कारवाई केली.

दि. १० जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रांजणगाव एमआयडीसी परिसरात गस्त घालत असताना, रांजणगाव हद्दीतील सरकारी दवाखान्याजवळ राहणारा विपुल संदीप विटकर (वय २०, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) हा त्याच्या राहत्या घरात तसेच घराजवळील पानटपरीमध्ये गांजा मिश्रित ‘बंटा’ नावाच्या गुंगीकारक गोळ्या बेकायदेशीररित्या विक्रीसाठी साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार तुषार पंदारे यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग यांचे आदेश घेण्यात आले. त्यानंतर पंचनामा करून स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने छापा कारवाई केली. या छाप्यात २०३ किलो ६०० ग्रॅम वजनाचा गांजा मिश्रित गुंगीकारक ‘बंटा’ गोळ्यांचा साठा आढळून आला. सदर साठ्याची किंमत ५७ हजार ३५० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी म्हणून पोलीस हवालदार तुषार अशोक पंदारे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले (शिरूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात यांच्यासह पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ, राजू मोमीन, राहुल पवार, दत्तात्रय शिंदे, विजय सरजिनेविलास आंबेकर यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात (रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे) करत आहेत.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??