क्राईम न्युज

भरधाव स्कुटर घसरून झालेल्या अपघातात प्रवासी ठार ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल…

उरुळीकांचन : पुणे–सोलापूर महामार्गावर उरुळीकांचन गावच्या हद्दीत विष्व पेट्रोल पंपासमोर भरधाव स्कुटर घसरून झालेल्या अपघातात प्रवासी ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 17) दुपारी घडली. याप्रकरणी स्कुटर चालकाविरुद्ध उरुळीकांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत नंदु बहरैची कुमार (वय 55, रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे; मूळ रा. उत्तर प्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे. तर स्कुटर चालक आकाश दिनेशकुमार राणा (वय 21, रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे; मूळ रा. सिरोही, राजस्थान) याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश राणा हा त्याच्या ताब्यातील सुझुकी अ‍ॅक्सेस स्कुटर (क्रमांक MH 12 TL 6908) वरून नंदु कुमार यांना पाठीमागे बसवून पुण्याहून सोलापूरकडे भरधाव वेगात जात होता. रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने अचानक तोल गेल्यामुळे स्कुटर घसरून अपघात झाला. या अपघातात नंदु कुमार यांना डोके व पोटावर गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी संतोष लक्ष्मण झोंबाडे (वय 35, व्यवसाय – ॲम्ब्युलन्स चालक, रा. झोंबाडेवस्ती, उरुळीकांचन) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक फौजदार भोसले करीत आहेत.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??