जिल्हाराजकीयसामाजिक

भाजपच्या बालेकिल्लात शिंदे गटाचा थेट हल्ला ; पेरणे–लोणीकंद जि. प. गटातून योगेश झुरुंगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, निलेश काळभोरांच्या नेतृत्वाखाली निर्णायक आघाडी…

लोणीकंद : पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटात निवडणुकीची रणधुमाळी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ने भाजपच्या प्रभावी आणि बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गटात थेट आक्रमक डाव टाकत राजकीय समीकरणे ढवळून काढली आहेत. लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांनी शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, या घोषणेमुळे संपूर्ण गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद यांच्या प्रभावाखालील गटात शिवसेना शिंदे गटाचा अधिकृत उमेदवार उतरवल्याने ही निवडणूक केवळ लढत न राहता प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपच्या बालेकिल्लात सुरुंग लावत शिंदे गटाने थेट आघाडी घेतल्याचे चित्र असून, या संपूर्ण रणनीतीमागे उपजिल्हाप्रमुख निलेश काळभोर यांची ठोस आणि आक्रमक भूमिका निर्णायक ठरत आहे. शिंदे गटाने योग्य उमेदवार, योग्य वेळ आणि प्रभावी संघटन यांचा मेळ साधत या गटात आपली ताकद उभी केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

ही निवडणूक शिवसेना सचिव राम रेपाळे तसेच माजी राज्यमंत्री व पुरंदर–हवेलीचे आमदार विजय बाप्पु शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जात असून, पक्षाने या गटासाठी स्वतंत्र आणि काटेकोर रणनीती आखली आहे. विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातील शिरूर–हवेली मतदारसंघातील तब्बल ५ जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गणांची संपूर्ण संघटनात्मक धुरा निलेश काळभोर यांच्याकडे सोपवण्यात आल्याने स्थानिक पातळीपासून जिल्हास्तरापर्यंत शिवसेना शिंदे गटाची यंत्रणा पूर्ण ताकदीने कामाला लागली आहे.

याचवेळी पंचायत समिती स्तरावरही शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. लोणीकंद पंचायत समिती गणातून वंदना अण्णासो शिवले तसेच पेरणे पंचायत समिती गणातून छाया ज्ञानेश्वर वाळके यांनी पंचायत समिती सदस्य पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती दोन्ही स्तरांवर शिंदे गटाने ताकद लावल्याचे स्पष्ट होत आहे. सर्व उमेदवार धनुष्यबाण या अधिकृत निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (हवेली) यशवंत माने यांच्याकडे आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. अर्ज दाखल करताना शिंदे गटाची मोठी शक्तिप्रदर्शनात्मक उपस्थिती पाहायला मिळाली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख निलेश काळभोर, लोणीकंदच्या माजी सरपंच प्रियांका झुरुंगे, पेरणेचे माजी उपसरपंच चांगदेव कोळपे, ज्ञानेश्वर वाळके, अण्णासो शिवले, सागर झुरुंगे, दीपक झुरुंगे, किसन टुले, भारत झुरुंगे यांच्यासह शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शक्तिप्रदर्शनामुळे पेरणे–लोणीकंद गटात निवडणूक लढत आणखी तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आEdite

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??