महाराष्ट्र

विश्वनाथ स्पोर्ट मिट – २०२५ ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाने राखले विजेतेपद; ‘एमआयटी डब्लूपीयू’ला स्पर्धेत दुसरे तर स.प. महाविद्यालयाला तिसरे स्थान..

 तुळशीराम घुसाळकर / हवेली

पुणे (हवेली) : विश्वनाथ स्पोर्ट मीट-२०२५ या राज्यस्थरिय आंतरमहाविद्यालयीन/ आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत यजमान एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करताना तब्बल १४ सुवर्ण व १८ रौप्यपदकांसह पदकतालिकेतील वर्चस्वासह आपले विजेतेपद राखले. एमआयटी एडीटी पाठोपाठ एमआयटी डब्लूपीयू संघाने एकूण ११ सुवर्ण व ६ रौप्य पदकांसह दुसरा तर सर परशूराम महाविद्यालय (स.प.) संघाने ६ सुवर्ण व ३ रौप्यपदकांसह स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला. एमआयटी एडीटी विद्यापीठाने गतवर्षीही वर्चस्व गाजविताना विजेतेपद पटकाविले होते.

तब्बल १५ क्रीडा प्रकारांत १४०+ अधिक शिक्षण संस्थांमधील ५००० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागासह झालेल्या या स्पर्धेचे बक्षिस वितरण ब्रिगेडीअर दिलीप पटवर्धन (निवृत्त), महाराष्ट्र सरकारच्या सहाय्यक क्रीडा अधिकारी व छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेत्या सायली तेजस शिंदे, विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनिता कराड, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, प्रा.पद्माकर फड, डाॅ.सुराज भोयार आदी पाहुण्यांच्या हजेरीत पार पडले. ज्यात विद्यार्थ्यांना १० लाखांपर्यंत रोख पारितोषिके, पदक व करंडक अशी बक्षिसे देण्यात आली.

बॅडमिंटन पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात एमआयटी एडीटीच्या खेळाडूंचा ३-१ असा पराभव करत कोथरूडच्या एमआयटी डब्लूपीयूने सुवर्ण कामगिरी केली. तर महिला गटात विश्वकर्मा इस्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीने अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचा २-० अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदक पटकाविले.

बुद्धिबळाच्या पुरुष गटात आशिष संकलेचाच्या कामगिरीच्या जोरावर व्हीआयटी पुणेने एमआयटी डब्लूपीयूचा तर महिलांत रिया मराठेच्या कामगिरीच्या बळावर एमआयटी डब्लूपीयूने एमआयटी एडीटीचा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले.
बास्केटबॉल पुरुषांच्या अंतिम सामन्यांत केबीपी सातारा महाविद्यालयाच्या संघाने एमआयटी डब्लूपीयू संघाचा तर महिलांत वारणा विद्यापीठ कोल्हापूरने एमआयटी एडीटी संघाचा पराभव करत सुवर्ण कामगिरीची नोंद केली. फुटबॉल स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात इशांत चितळेच्या नेतृत्वाखालील एनडीए खडकवासलाने नेस वाडीय महाविद्यालय, पुणेचा पराभव केला. नेस वाडीया महाविद्यालयाच्या हितेश यादवला सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर महिलांत एमआयटी डब्लूपीयू संघाने एमआयटी एडीटी संघाचा ३-१ अशा फरकाने पराभव केला. तर भाग्यश्री मुखारे ही सर्वोत्तम खेळाडू ठरली.

कबड्डी पुरुष गटात एमआयटी एडीटी विद्यापीठ संघाने भारती विद्यापीठ संघाचा तर महिलांत विद्या प्रतिष्ठान बारामती संघाने एमआयटी एडीटी संघाचा पराभव करताना सुवर्णकामगिरीची नोंद केली. सौरभ रणावरे व तेजश्री चौघुले हे स्पर्धेतील सर्वात्तम खेळाडू ठरले.

अत्यंत रोमांचक ठरलेल्या पुरुष खो-खोच्या अंतिम सामन्यात गणपतराव काळभोर महाविद्यालयाने डी.वाय. पाटील विद्यापीठ आकुर्डीचा तर महिलांत विद्या प्रतिष्ठाण बारामतीने डी.वाय.पाटील अंबीचा पराभव केला. श्रेया गोसावी ही सर्वोत्तम खेळाडू ठरली. टेनिसच्या दोन्ही गटांत एनडीए खडकवासला व एमआयटी डब्ल्यूपीयूने विजेतेपद पटकाविले तर, व्हॉलीबॉलमध्ये टी.सी. काॅलेज बारामती व माॅडर्न महाविद्यालयाने सुवर्णकामगिरी केली. वाॅटर पोलो या खेळांतही एमआयटी शिक्षण समुहांच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले.

                      नेस वाडीया महाविद्यालयाकडे क्रिकेट करंडक

स्पर्धेत सर्वांत रोमांचक ठरलेल्या व एकूण ३६ संघांमध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद नेस वाडीया महाविद्यालयाने पटकाविले. त्यांनी डी.वाय.पाटील विद्यापीठ आकुर्डीचा पराभव केला. ज्यात तिलक जाधव (२५९ धावा) याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. महिलांत एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या संघाने एमआयटी सोफा संघाचा पराभव केला.

                        रोईंगमध्ये एमआयटी बोट क्लबचे वर्चस्व

विद्यापीठाच्या बोट क्लबवर पार पडलेल्या विविध गटांच्या इनडोअर रोईंग स्पर्धेच्या पुरुष व महिला सिंगल स्कल प्रकारात योगेश बोराले व साक्षी धमाले यांनी तर डबल स्कल प्रकारात अनिकेत कोलते, यशराज गायकवाड विक्रमी वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर 4ई (५०० मी.) प्रकारात एकंदर एमआयटी एडीटी बोट क्लबच्या खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी करताना वर्चस्व राखले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??