जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

पालखी सोहळ्यात हर्षवर्धन पाटील यांची भावनिक उपस्थिती…

पुणे (इंदापूर) : जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे निमगाव केतकी येथून रविवारी (दि.२९) सकाळी पायी चालत सहभागी झाले.

बावडा येथील हर्षवर्धन पाटील यांच्या घराण्याला वारकरी संप्रदायाची अनेक पिढ्यांपासूनची मोठी परंपरा आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे गेली २९ वर्षांपासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये पायी चालत सहभागी होत आहेत.

पंढरीचा विठ्ठल हे साऱ्या विश्वाचे दैवत आहे, वारकरी परंपरा हे महाराष्ट्राचे वैभव आहे, पालखी सोहळ्यामध्ये पायी चालल्याने मिळणारा आनंद हा शब्दात व्यक्त करता येत नाही, त्यामुळे प्रत्येक वर्षी मी पालखी सोहळ्यामध्ये पायी चालत सहभागी होत असतो. पालखी सोहळे व वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे भूषण आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. देहूचे संत तुकाराम महाराजांचे वंशज मोरे घराणे व बावड्याचे हर्षवर्धन पाटील यांचे घराणे यांचे अनेक शतकांपासून ऋणानुबंध आहेत. बावडा येथे रत्नाई निवासस्थानी हर्षवर्धन पाटील हे दरवर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांचा व देहू संस्थांनच्या विश्वस्तांचा सन्मान करतात. दरम्यान, आज सोमवारी सकाळी पालखी सोहळा बावड्याकडे प्रस्थान केले.

संपादक डॉ गजानन टिंगरे

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??