जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

लोणी काळभोरमध्ये राष्ट्रवादीचा कौल ; दोन जागांवर दणदणीत विजय, एका जागेवर अपक्षाचा धक्का… मतदारांनी नव्या नेतृत्वाला दिली संधी…

राष्ट्रवादीचा झेंडा फडकला ; लोणी काळभोरमध्ये भाजपचा पराभव

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत लोणी काळभोर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. लोणी काळभोर जिल्हा परिषद गट आणि कदमवाकवस्ती पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाचा झेंडा फडकावला असून, लोणी काळभोर पंचायत समिती गणात अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. या निकालामुळे या परिसरात भाजपचा पूर्णपणे सुपडासाफ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोणी काळभोर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शीतल सुजीत कांबळे यांनी जोरदार मुसंडी मारत १५,५२९ मते मिळवली. त्यांनी भाजपच्या पूनम बाबुराव गायकवाड यांचा ४,८१० मतांनी दणदणीत पराभव केला. प्रचाराच्या काळात स्थानिक प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, महिला सक्षमीकरण व सामाजिक न्याय या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला होता. या मुद्द्यांना मतदारांनी स्पष्ट पाठिंबा दिल्याचे निकालातून दिसून आले.

कदमवाकवस्ती पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचे अमोल त्रिंबक टेकाळे यांनी ६,८९२ मते मिळवत भाजपचे ज्ञानेश्वर नामुगडे यांचा २२० मतांनी पराभव करत विजय संपादन केला. ही लढत अत्यंत अटीतटीची ठरली. शेवटच्या फेरीपर्यंत निकालाची उत्कंठा कायम होती. अखेर अमोल टेकाळे यांनी विजय मिळवत राष्ट्रवादीच्या खात्यात दुसरी जागा जमा केली.

दरम्यान, लोणी काळभोर पंचायत समिती गणात अपक्ष उमेदवार विद्या दत्तात्रय गायकवाड यांनी ५,५७० मते मिळवत राष्ट्रवादीच्या रेश्मा काळभोर यांचा १२८ मतांनी निसटता पराभव केला. या गणात मतदानाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी राहिली. विशेषतः लोणी काळभोर गावात मतदान कमी झाल्याचा फटका राष्ट्रवादीला बसल्याची चर्चा आहे. तसेच, एकाच गावातील तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने मतांचे विभाजन झाले आणि त्याचा परिणाम थेट निकालावर झाला, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

लोणी काळभोर गटात एकूण ५१,३३६ मतदारांपैकी २९,४८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी मतदान टक्केवारी समाधानकारक असली तरी काही भागात अपेक्षित मतदान न झाल्याचे चित्र दिसून आले.

विजयानंतर परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. शीतल कांबळे, अमोल टेकाळे आणि अपक्ष विद्या गायकवाड यांनी मतदारांचे आभार मानत, राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य सुविधा तसेच महिलांसाठी विशेष योजना राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “सर्वांना सोबत घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख विकास केला जाईल,” असा विश्वास विजयी उमेदवारांनी व्यक्त केला.

या निकालामुळे लोणी काळभोर परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल घडून येण्याची चिन्हे असून, आगामी स्थानिक राजकारणावर या विजयाचा मोठा प्रभाव राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??