जिल्हामहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत ‘एमआयटी एडीटी’च्या भाग्यश्री घुलेची सुवर्ण कमाई, आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी राष्ट्रीय सराव शिबिरात निवड…

पुणे : Army Rowing Node येथे नुकत्याच पार पडलेल्या ४३व्या वरिष्ठ राष्ट्रीय रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत MIT Art, Design and Technology Universityच्या डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमीची खेळाडू भाग्यश्री घुले हिने शानदार कामगिरी करत एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावले. तिच्या या यशामुळे विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात मानाची भर पडली आहे.

या उल्लेखनीय यशाच्या जोरावर भाग्यश्रीची आगामी Asian Games स्पर्धेच्या तयारीसाठी कर्नाटकातील Bellary येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सराव शिबिरासाठी निवड झाली आहे. जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

भाग्यश्री ही एमआयटी एडीटी शिक्षण संकुलातील माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुलच्या कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी असून तिला विद्यापीठातील राष्ट्रीय रोइंग प्रशिक्षक संदीप भापकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे तिने राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी नोंदवली आहे.

तिच्या या यशानंतर विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, माईर्स शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. स्वाती चाटे-कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस., कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभाग संचालक प्रा. पद्माकर फड, प्रकल्प संचालक डॉ. ज्योती जोटवानी तसेच प्राचार्या डॉ. रिपल शर्मा यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भाग्यश्रीच्या या कामगिरीमुळे विद्यापीठासह राज्यातील युवा खेळाडूंना निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??