क्राईम न्युज

पुणे शहरातील सराईत गुन्हेगारांना गावठी पिस्टल विक्री करणारी टोळी जेरबंद…

फुरसुंगी (हडपसर) : पुणे शहरातील सराईत गुन्हेगारांना बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीची पिस्टले व जिवंत काडतुसे पुरविणाऱ्या टोळीचा फुरसुंगी पोलीस स्टेशन पोलिसांनी पर्दाफाश करत मुख्य सूत्रधारासह अनेक आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे पुणे शहरात बेकायदेशीर शस्त्रपुरवठा साखळीला मोठा धक्का बसला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मंतरवाडी फाटा, फुरसुंगी येथे आरोपी अमर हनुमंत गाडे (रा. खराडी, पुणे) याला १ गावठी बनावटीचे पिस्टल, मॅगझीन व ३ जिवंत काडतुसे विनापरवाना बाळगताना ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत तडीपार आरोपी गोपाळ संजय यादव (रा. शिरूर, जि. पुणे) हाही मिळून आल्याने त्यालाही अटक करण्यात आली.

तपासादरम्यान सनी संजय यादव याने पिस्टल खरेदीसाठी रोख रक्कम पुरविल्याचे तसेच निशांत भगवान भगत हा आरोपींसोबत मध्यप्रदेश येथे जाऊन शस्त्र खरेदीत सहभागी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दि. २ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपासात सचिन ऊर्फ पप्पू दत्तात्रय घोलप (रा. धनकवडी, पुणे) याने गावठी पिस्टल खरेदीसाठी सांगितल्याचे उघड झाले. आरोपींनी मध्यप्रदेश राज्यातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील लाकडी हनुमान गाव येथून सनीसिंग ऊर्फ बच्चनसिंग ऊर्फ सनीभाई दिवानसिंग चावला (रा. उमरठी, ता. वरला, जि. बरवानी, मध्यप्रदेश) याच्याकडून पिस्टल, मॅगझीन व जिवंत काडतुसे घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले.

पोलिसांनी मध्यप्रदेशमधील वरला पोलीस स्टेशनच्या मदतीने शोधमोहीम राबवली. दरम्यान संबंधित आरोपी हा पुण्यातील विविध गुन्ह्यांमध्ये अटकेत असून सध्या येरवडा कारागृह येथे असल्याची माहिती मिळाली. न्यायालयीन आदेशानंतर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

चौकशीत सनीसिंग याने उमरठी (मध्यप्रदेश) येथील क्रेझीमॉन्टी ऊर्फ जयबीरसिंग प्रकाशसिंग चावला, गुरुचरणसिंग आवसिंग बर्नाला, परविनसिंग उत्तमसिंग टकराना, राजपालसिंग प्रधानसिंग जुनेजा, अलोकसिंग जोहरसिंग बर्नाला आणि नानकसिंग अजितसिंग बर्नाला यांच्या मदतीने गावठी पिस्टल तयार करून वेगवेगळ्या गुन्हेगारांना विक्री करत असल्याची कबुली दिली. संबंधित आरोपींनाही न्यायालयीन आदेशानंतर येरवडा कारागृहातून ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त, परिमंडळ ६ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक महेश नलवडे, विनोद पवार, सहाय्यक पोलीस फौजदार सिध्देश्वर पळसे, पोलीस हवालदार सतीश काळे, हरिदास कदम, श्रीनाथ जाधवगणेश शिंदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

या धडक कारवाईमुळे पुणे शहरातील बेकायदेशीर शस्त्रविक्रीच्या जाळ्याला मोठा आळा बसला असून पुढील तपास सुरू आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??