जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

कुंजीरवाडीत एस.टी. थांब्यासाठी जोरदार मागणी ; स्वप्नील कुंजीर पाटील यांचे पुणे विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन…

कुंजीरवाडी (ता. हवेली) : हवेली तालुक्यातील वेगाने विकसित होत असलेल्या कुंजीरवाडी गावात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एस.टी.) अधिकृत थांबा सुरू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना हवेली तालुका प्रमुख स्वप्नील सुमनताई वसंतराव कुंजीर पाटील यांनी पुणे विभागीय मुख्य अधिकारी अरुण भगतसिंग सिया यांना निवेदन सादर केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश कुंजीर हे देखील उपस्थित होते.

कुंजीरवाडी हे गाव सध्या व्यापारी, औद्योगिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने झपाट्याने विस्तारत असून, राज्यातील विविध भागांतून अनेक कुटुंबे येथे स्थायिक झाली आहेत. विशेषतः सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, अहिल्यानगर तसेच मराठवाडा आणि विदर्भातील अनेक नागरिक रोजगार, व्यवसाय व उदरनिर्वाहासाठी कुंजीरवाडीत वास्तव्यास आहेत. मात्र, गावात एस.टी.चा अधिकृत थांबा नसल्यामुळे या नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

सध्या नागरिकांना एस.टी. पकडण्यासाठी अनेक किलोमीटर अंतर प्रवास करावा लागत असून, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि कामगार वर्गाला याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे. कुंजीरवाडीपासून जवळपास सात किलोमीटर परिसरात कोणताही सोयीस्कर एस.टी. थांबा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे आर्थिक भुर्दंडासोबतच वेळेचाही मोठा अपव्यय होत असल्याची बाब निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे.

तसेच गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट यांसारख्या धार्मिक स्थळांना जाणाऱ्या भाविकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला भाविकांना रात्री-अपरात्री प्रवास करताना सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याने गावात थेट एस.टी. थांबा असणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
गावातील सरकारी दवाखान्याजवळ एस.टी. थांबा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, महिलांना दैनंदिन प्रवासासाठी, कामगारांना रोजगारासाठी तसेच व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी मोठा दिलासा मिळेल. वाढती लोकसंख्या, गावाचा व्यापारी विस्तार आणि नागरिकांची गरज लक्षात घेता प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन कुंजीरवाडी येथे एस.टी. थांबा मंजूर करावा, अशी मागणी स्वप्नील कुंजीर पाटील यांनी केली.

दरम्यान, पुणे विभागीय मुख्य अधिकारी अरुण भगतसिंग सिया यांच्याशी यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. कुंजीरवाडीतील नागरिकांच्या अडचणी आणि वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन लवकरात लवकर एस.टी. थांबा सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. गावातील नागरिकांकडूनही या मागणीला मोठा पाठिंबा मिळत असून, प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??