जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

घरेलू कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन; सामाजिक सुरक्षा व किमान वेतनाची मागणी…

पुणे / मुंबई : (दि. १० मार्च २०२६) महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती संलग्न आनंद आधार घरेलू कामगार संघटना, पुणे यांच्या वतीने सुमारे शंभर घरेलू कामगार महिलांनी मुंबई येथील आझाद मैदानावर एकत्र येत विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. घरेलू कामगारांना कायदेशीर हक्क, सामाजिक सुरक्षा व आर्थिक स्थैर्य मिळावे या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्रात हजारो महिला घरकाम करून आपला उदरनिर्वाह करत असल्या तरी त्यांना आजही अनेक मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे लागत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. घरेलू कामगारांसाठी ठोस कायदा, किमान वेतनाची हमी, सामाजिक सुरक्षा योजना आणि वृद्धापकाळात आर्थिक आधार देणारी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

या आंदोलनात महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीचे ज्येष्ठ नेते कॉ. उदय भट, ज्ञानेश पाटील आणि राजू वंजारे यांनी आंदोलनाला मार्गदर्शन केले. पुण्यातून आनंद आधार घरेलू कामगार संघटनेच्या संस्थापिका अनिता गोरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला कामगार सहभागी झाल्या.

या वेळी महेंद्र जैन जांगडे, कौशल्य इजगज, मंगल सूर्यवंशी, अंजना देडे, ज्योती, सारिका साळवे चौहान, प्रमिला शिर्के, गोपिका सुरवंशी, पुजा मोरे, अनिता शेलार, निता काळे, पद्मिनी म्हेत्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

आंदोलनादरम्यान महिलांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. आंदोलकांनी सरकारकडे काही प्रमुख मागण्या मांडल्या. त्यामध्ये घरेलू कामगारांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करणे, किमान वेतन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे, घरेलू कामगारांच्या कल्याणासाठी दरवर्षी किमान १०० कोटी रुपयांची तरतूद करणे तसेच ६० वर्षांवरील महिला घरेलू कामगारांना दरमहा किमान ५,००० रुपयांची पेन्शन योजना तात्काळ लागू करावी, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय सध्या वाढत असलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे घरकामासाठी कामगार पुरवणाऱ्या “बुक माय बाई” आणि “अर्बन कंपनी” सारख्या ॲप कंपन्यांना कायद्याच्या चौकटीत आणून घरेलू कामगारांचे शोषण थांबवावे आणि त्यांना योग्य मोबदला व संरक्षण मिळावे, अशीही मागणी आंदोलकांनी केली.

आंदोलनानंतर या सर्व मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात आले. सरकारने घरेलू कामगारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा येत्या काळात राज्यभर अधिक तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??