क्राईम न्युज

रात्रीच्या गस्तीत पोलिसांची कारवाई : घरफोडीच्या तयारीत असलेला एक जेरबंद, साथीदार फरार…

उरुळीकांचन (ता. हवेली, जि. पुणे) : रात्रीच्या गस्तीदरम्यान संशयास्पद हालचाली करत घरफोडीच्या तयारीत असलेल्या इसमावर उरुळीकांचन पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीस ताब्यात घेतले असून त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल शरद भानुदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून मुंबई पोलीस कायदा कलम 122 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 20 मार्च 2026 रोजी रात्री 11.00 ते 21 मार्च पहाटे 5.00 या वेळेत सुरू असलेल्या पेट्रोलिंगदरम्यान करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळीकांचन हद्दीत साखरे पेट्रोल पंपाजवळ, सदानंद बेकरीच्या पाठीमागे तुपेवस्ती रोडवर पहाटे सुमारे 3.00 वाजता दोन इसम संशयास्पद स्थितीत आढळून आले. त्यांनी चेहऱ्यावर काळे रुमाल बांधले होते आणि नंबर प्लेट नसलेल्या गोल्डन रंगाच्या अॅक्टिवावर दबा धरून बसले होते.

पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून विशाल कैलास साबळे (वय 29, रा. तुपेवस्ती, उरुळीकांचन) याला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार सनी अगरवाल हा अंधाराचा फायदा घेत पळून गेला.

ताब्यात घेतलेल्या आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून लोखंडी कटावणी, धारदार स्क्रू ड्रायव्हर, काळा रुमाल तसेच नंबर प्लेट नसलेली अॅक्टिवा जप्त करण्यात आली. ही साधने घरफोडी किंवा चोरी करण्यासाठी वापरण्यात येतात, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

या प्रकरणी उरुळीकांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार चोरमले करीत आहेत.

पोलिसांचा इशारा…

रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली दिसल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??